आतील पान -
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
दिल्लीत मुंडे यांचे स्मारक
आतील पान -
दिल्लीत मुंडे यांचे स्मारकउभारण्याची मागणीलोकसभेत प्रस्ताव : सभागृहाचा उत्स्फूर्त प्रतिसादनवी दिल्ली : दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्याची तसेच राजधानीतील त्या अपघातस्थळाच्या रस्त्याला नाव देण्याची मागणी शुक्रवारी सायंकाळी शून्यप्रहरात लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांनी केली. मुंडे यांची शुक्रवारी जयंती होती. विशेष म्हणजे, शून्यप्रहरातील मागणीला समर्थन देण्यासाठी कोणत्याही सदस्यांना सूचना करता येते; मात्र बोलता येत नाही. जेव्हा ही मागणी करण्यात आली, तेव्हा संपूर्ण सभागृहाने तिला उस्फूर्त दाद दिली. जयंती असल्याने त्यांना मानवंदना देण्यासाठी आपण ही मागणी करत असल्याचे गायकवाड यांनी सभागृहाला सांगितले.तीन जून रोजी ते दिल्लीहून परळी येथे जाण्यासाठी विमानतळाकडे येत असताना लोधी रोडवरील आर. के. पुरममधील अरविंदो मार्गावर त्यांचा अपघात झाल्याने ते दगावले. त्या अपघातस्थळी त्यांचे स्मारक व त्या मार्गाला त्यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली. अनेक सदस्यांनी त्यांना समर्थन दिले.