Join us  

घाऊक क्षेत्रातील महागाई १४ महिन्यांच्या उच्चांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 1:50 AM

मे महिन्यात घाऊक किमतींवर आधारित महागाईचा दर वाढून ४.४३ टक्के झाला असून, हा १४ महिन्यांचा उच्चांक आहे. इंधन व भाजीपाल्याच्या किमतीतील वाढीचा हा परिणाम आहे.

नवी दिल्ली - मे महिन्यात घाऊक किमतींवर आधारित महागाईचा दर वाढून ४.४३ टक्के झाला असून, हा १४ महिन्यांचा उच्चांक आहे. इंधन व भाजीपाल्याच्या किमतीतील वाढीचा हा परिणाम आहे.महागाई एप्रिलमध्ये ३.१८ टक्के, तर गेल्या वर्षी मेमध्ये २.२६ टक्के होती. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, खाद्य वस्तूंची महागाई मे २0१८ मध्ये १.६0 टक्का राहिली. आदल्या महिन्यात ती 0.८७ टक्का होती. भाजीपाल्याची महागाई २.५१ टक्के राहिली. आदल्या महिन्यात ती उणे (-) 0.८९ टक्का होती. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाईचा दर मेमध्ये ११.२२ टक्के राहिला. एप्रिलमध्ये तो ७.८५ टक्के होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे भारतातील इंधनाच्या किमतीही वाढविल्या आहेत. त्यामुळे ऊर्जा क्षेत्रातील महागाईचा निर्देंशांक वर चढला आहे. बटाट्यांचा महागाईचा दर ८१.९३ टक्के झाला. एप्रिलमध्ये तो ६७.९४ टक्के होता. फळांच्या किमतींमधील वाढ १५.४0 टक्के राहिली. डाळींच्या किमतींमधील वाढ २१.१३% राहिली. मार्च महिन्यात घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर सुधारून २.७४% केला आहे. हंगामी आकडेवारीत तो २.४७% दाखविण्यात आला होता.वर्षातील सर्वाधिकमे महिन्यातील घाऊक क्षेत्रातील ४.४३ टक्क्यांचा महागाईचा दर १ महिन्याचा म्हणजेच मार्च २0१७ नंतरचा उच्चांक ठरला आहे. मार्च २0१७ मध्ये हा दर ५.११ टक्के होता. महागाईचा दर वाढणार हे अपेक्षितच होते.रिझर्व्ह बँकेने त्यानुसार धोरणात्मक व्याजदरात 0.२५ टक्क्याची वाढ त्यामुळेच केली आहे. तब्बल ४ वर्षांनंतर रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढविले आहेत.

टॅग्स :महागाईअर्थव्यवस्था