Join us  

महागाईचा दर पंधरा महिन्यांच्या उच्चांकावर, केंद्रीय सांख्यिकी विभागाकडून दर जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 5:54 AM

ग्राहक मूल्य निर्देशांक अर्थात किरकोळ महागाई दरात सलग दुस-यांदा वाढ झाली आहे. आॅक्टोबरच्या ३.५८ टक्क्यांच्या तुलनेत नोव्हेंबरचा हा दर ४.८८ टक्के राहिला आहे. दराने १५ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे.

मुंबई : ग्राहक मूल्य निर्देशांक अर्थात किरकोळ महागाई दरात सलग दुस-यांदा वाढ झाली आहे. आॅक्टोबरच्या ३.५८ टक्क्यांच्या तुलनेत नोव्हेंबरचा हा दर ४.८८ टक्के राहिला आहे. दराने १५ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाकडून दर महिन्यातील महागाईचा दर जारी केला जातो. हा दर घाऊक मूल्य व ग्राहक मूल्यानुसार असतो. ग्राहक मूल्याचा दर किरकोळ महागाई दर म्हणून ओळखला जातो.विभागाने मंगळवारी जारी केलेल्या अहवालानुसार, हा दर ४.८८ टक्के आहे. मागीलवर्षी याच महिन्यात हा दर ३.६३ टक्के होता. नोव्हेंबर २०१७ मध्ये ग्रामीण भागात हा दर ४.७९ टक्के तर शहरी भागात ४.९० टक्के राहिला आहे.रिझर्व्ह बँकेचा अंदाज- खाद्यान्न आणि इंधनाचे दर वाढण्याची शक्यता असल्याने महागाई वाढेल, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने बांधला होता. त्यासाठीच त्यांनी द्वैमासिक पतधोरणात व्याजदरात कपात केली नाही. बँकेचा हा अंदाज खरा ठरल्याचे महागाई दरावरून दिसून आले आहे. या दोन क्षेत्रांसोबतच तंबाखुजन्य पदार्थ, कपडे, गृह या क्षेत्राच्या महागाई दरातदेखील नोव्हेंबर महिन्यात मोठी वाढ झाली आहे.

टॅग्स :अर्थव्यवस्था