Join us  

औद्योगिक निर्देशांक केवळ ४.३%; आर्थिक मंदीमुळेच आला खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 3:37 AM

आर्थिक मंदीमुळे देशातील औद्योगिक उत्पादनात मोठी घट झाली

नवी दिल्ली : आर्थिक मंदीमुळे देशातील औद्योगिक उत्पादनात मोठी घट झाली असून, औद्योगिक निर्देशांक ४.३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. सात वर्षांत प्रथमच असे घडले आहे. सांख्यिकी कार्यालयाच्या माहितीमुळे औद्योगिक स्थिती चिंताजनक असल्याचे उघड झाले आहे.सप्टेंबरमध्ये कोळसा, पोलाद उत्पादन, वीजनिर्मिती, तसेच अन्य उत्पादनात ही घट झाली आहे. बरोबर साडेसात वर्षांपूर्वी म्हणजे एप्रिल, २0१२ मध्ये औद्योगिक उत्पादनाचा दर 0.७ इतका खाली गेला होता. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक ४.६ टक्के होता. यंदा झालेली घट 0.३ टक्के आहे. देशातील जी २३ प्रमुख औद्योगिक उत्पादन क्षेत्रे आहेत, त्यातील १९ क्षेत्रांची कामिगिरी नकारात्मक आहे.यंदाच्या सप्टेंबरात वीजनिर्मिती २.६ आहे. गेल्या सप्टेंबरात ती ८.२ टक्के होती, तसेच कोळसा व पोलाद उत्पादनात घट होऊ न ते ८.५ टक्क्यांवर आहे आहे. निर्मिती क्षेत्रही ४.८ टक्क्यांवरून ३.९ टक्क्यांवर आहे आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत औद्योगिक उत्पादनाचा दर ४.८ टक्के होता. तो यंदाच्या सहामाहीत १.३ टक्क्यांवर आला आहे.>कामगार कपात मात्र झाली मोठीदेशामध्ये गेले काही महिने आर्थिक मंदीचे वातावरण असून, बाजारातील वस्तूंना मागणी नाही. ती नसल्याने उत्पादन कमी होत असून, त्यामुळे अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कामगार कपात सुरू केली आहे. गुंतवणूकही कमीच होत चालली आहे. उत्पादनात इतकी घट होण्याचे महत्त्वाचे कारण मागणी नसणे हेच आहे.