Join us  

दहा वर्षांत भारत तिसरी सक्षम अर्थव्यवस्था- मुकेश अंबानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 1:03 AM

वय ३५ हून कमी असलेल्या ६३ टक्के युवकांच्या जोरावर भारत येत्या १0 वर्षांत जगातील तिसरी सक्षम अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला.

लंडन : वय ३५ हून कमी असलेल्या ६३ टक्के युवकांच्या जोरावर भारत येत्या १0 वर्षांत जगातील तिसरी सक्षम अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला.आर्सेलर मित्तल समूहातर्फे उद्योग पुरस्कारांचे अलीकडेच येथे वाटप झाले. त्यामध्ये मुकेश अंबानी यांचा ‘ड्रायव्हर्स आॅफ चेंज’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या वेळी अंबानी म्हणाले की, भारतात २जी येण्यासाठी २५ वर्षे लागली. पण जिओने तीन वर्षांत ४ जी नेटवर्क उभे केले. याच आधारे २०१९ मध्ये भारत ४जी श्रेणीत जगात अव्वल होईल. आजही मोबाइलधारकांना केवळ बोलण्यासाठी महिना २०० ते ३०० रुपये खर्च करावे लागतात. त्यांचा विचार करून ४जी एलटीई स्मार्ट फोन ही स्वस्त दरातील संकल्पना आम्ही तयार केली. आज जिओ देशातील १९ लाख शाळा व ५८ हजार विद्यापीठांना संलग्न आहे. डिजिटलच्या आधारे होणारा भारताचा विकास हा अभूतपूर्व असेल.