Join us  

भारतीयांची ‘सवारी’ होतेय ‘लक्झरी’, आरामदायी गाड्यांची बाजाराकडे झपाट्याने कूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:18 AM

भारतीय कार बाजार हा झपाट्याने आरामदायी अर्थात, लक्झरी श्रेणीकडे जात आहे. भारतीय कार मालकांमधील अशा गाड्यांची ‘क्रेझ’ जोमाने वाढत असल्याचे चित्र येथे सुरू असलेल्या आॅटो एक्स्पोत प्रकर्षाने समोर येते.

चिन्मय काळे नॉयडा : भारतीय कार बाजार हा झपाट्याने आरामदायी अर्थात, लक्झरी श्रेणीकडे जात आहे. भारतीय कार मालकांमधील अशा गाड्यांची ‘क्रेझ’ जोमाने वाढत असल्याचे चित्र येथे सुरू असलेल्या आॅटो एक्स्पोत प्रकर्षाने समोर येते. यंदा सादर झालेल्या गाड्या एक तर कन्सेप्ट आहेत किंवा आलिशान श्रेणीतील होत्या. सर्वसामान्य म्हणून ओळख असलेल्या कमी किमतीतील नवीन गाड्या नजरेसच पडत नाहीत.जगभरातील कार बाजारावर युरोपाचे वर्चस्व आहे. आलिशान, आरामदायी, आकर्षक गाड्यांचा विचार केल्यास मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, आॅडी, स्कोडा यासारख्या युरोपियन गाड्या डोळ्यासमोर येतात. या गाड्यांची भारतीयांना भुरळ आहेच. मात्र, आतापर्यंत अशा गाड्या घेणाºयांची टक्केवारी कमी आहे. आजही साडेतीन लाख ते ७ लाख रुपयांपर्यंतच्या श्रेणीतील गाड्यांनाच अधिक मागणी आहे. टाटा, मारुती, ह्युंदाईकडून या श्रेणीत भारतीयांची गरज पूर्ण होते. या श्रेणीतील किमान २२ ते २५ नवीन गाड्या दरवर्षी आॅटो एक्स्पोत सादर होतात. यंदा मात्र, संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे.‘भारतीय कार बाजाराचा जीडीपी ७ टक्के असून, सातत्याने वाढता आहे. हा उद्योग आता जोमाने वाढत आहे. त्यातही आता भारतीय आॅटोमोबाइल क्षेत्र हे चमकते ठरत आहे. याचाच अर्थ, ते आरामदायी श्रेणीकडे जात आहे. ग्राहकांची मागणी त्या दिशेने आहे,’ असे मत मर्सिडीज-बेन्झ इंडियाचे सीईओ रोलॅण्ड फॉगर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. हीच स्थिती बाइक अथवा दुचाकी बाजारातही दिसून येते. आतापर्यंत ४५ हजार ते ६५ हजार रुपयांची दुचाकी हा भारतीय दुचाकी बाजार असतो. या श्रेणीतील दरवर्षी किमान ८-१० नवीन गाड्या दाखल होतात. यंदाच्या एक्स्पोत मात्र अशा केवळ दोन दुचाकी सादर झाल्या. कंपन्यांनी लाख रुपयांच्या श्रेणीतील आलिशान बाइकवर भर दिला आहे.ग्राहकांचा कन्फर्टवर भर-आॅटो एक्स्पोत यंदा ७५ नवीन कार्स सादर झाल्या. या आधीच्या आॅटो एक्स्पोचा विचार केल्यास, ७५ पैकी किमान ५० गाड्या या आगमन श्रेणी (३ ते ५ लाख) किंवा मध्यम श्रेणी (५ ते ९ लाख) रुपयांदरम्यानच्या असत. यंदा मात्र, ७५ पैकी जेमतेम १० गाड्या या सर्वसामान्यांच्या श्रेणीतील होत्या.अन्यथा आजवर स्वस्त दरातील गाड्या तयार करणा-याटाटा, महिंद्रा, ह्युंदाई, मारुती यांनीही आलिशान श्रेणीकडे कूच केल्याचे दिसून आले. या कंपन्यांनीही त्यांच्या १२लाख रुपयांच्या वरील आधुनिक गाड्या सादर करण्यास प्राधान्य दिले आहे. गाडीचा ‘कन्फर्ट’ हे अशा गाड्यांचे मूळ वैशिष्ट्य होते.पसंती बदलतेय-37% इतकी घट नव्या बाइकच्या लाँचिंगमध्ये झाली आहे.18% एवढा हिस्सा आता बाजारात छोट्या कार्सचा आहे. आधी हा २४.४ टक्के होता.कार्समधील फरक असा-आगमन श्रेणी                                                                 आरामदायी श्रेणी३ लाखांपासून                                                                   किमान १० लाखएबीएस प्रणाली नाही                                                         प्रत्येक गाडीत एबीएससमोर पॉवरविंडो                                                              सर्व पॉवर विंडोकेवळ एसी एसीसह रिअर वायपर,                                   पॉवर स्टिअरिंगएअर बॅग्सचा अभाव समोर दोन एअर बॅग्स,                      पार्किंग सेंसर्स, वाहतूक सेंसर्स, रिमोट आॅपरेशन्स

टॅग्स :ऑटो एक्स्पो २०१८