Join us  

भारतीय अर्थव्यवस्था निराशेच्या गर्तेत; रिझर्व्ह बँकेचा सर्व्हे; रोजगार हा चिंतेचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:09 AM

भारताची सर्वसाधारण अर्थव्यवस्था (जनरल इकॉनॉमी) निराशेच्या गर्तेत सापडली असून, रोजगार हा चिंतेचा मुख्य विषय बनला आहे, असे चित्र रिझर्व्ह बँकेच्या विविध सर्वेक्षणांतून समोर आले आहे.

मुंबई : भारताची सर्वसाधारण अर्थव्यवस्था (जनरल इकॉनॉमी) निराशेच्या गर्तेत सापडली असून, रोजगार हा चिंतेचा मुख्य विषय बनला आहे, असे चित्र रिझर्व्ह बँकेच्या विविध सर्वेक्षणांतून समोर आले आहे. ग्राहक आत्मविश्वास आणि वस्तू उत्पादन क्षेत्रातील व्यावसायिक धारणा घसरली आहे. महागाई वाढत आहे आणि वृद्धीदर घसरत आहे, अशी अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती आहे.

सर्वेक्षणातील ही तथ्ये रिझर्व्ह बँकेने ४ आॅक्टोबर रोजी सादर केलेल्या पतधोरण आढाव्याशी सुसंगत आहेत. या आढाव्यात रिझर्व्ह बँकेने २0१७-१८ या वर्षासाठीचा वृद्धी अंदाज ७.३ टक्क्यांवरून कमी करून ६.७ टक्के केला आहे. विशेष म्हणजे देशाची सर्वसाधारण आर्थिक स्थिती सलग चौथ्या तिमाहीत निराशेच्या गर्तेत आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या ग्राहक आत्मविश्वास सर्वेक्षणानुसार, अर्थव्यवस्था सुधारली असे म्हणणा-यांची संख्या सप्टेंबर २0१६ मध्ये ४४.६ टक्के होती, ती सप्टेंबर २0१७ मध्ये ३४.६ टक्क्यांवर घसरली आहे. याउलट ४0.७ टक्के उत्तरदात्यांना वाटते की, अर्थव्यवस्था आणखी वाईट झाली आहे. आगामी वर्षात अर्थव्यवस्था सुधारेल, असे म्हणणाºयांची संख्या २0१६ च्या सप्टेंबरमध्ये ६६.३ टक्के होती. ती यंदा ५0.८ टक्के झाली आहे.

ग्राहक आत्मविश्वास सर्वेक्षणाचा एक भाग असलेला ‘विद्यमान परिस्थिती निर्देशांक’ (सीएसआय) आणखी निराशाजनक पातळीवर घसरला आहे. किमतीची पातळी आणि उत्पन्न यांचा मेळ बिघडल्याचे त्यातून दिसते.भविष्य अपेक्षा निर्देशांकही आणखी खाली घसरला आहे. या निर्देशांकात आगामी सहा महिन्यांच्या स्थितीचा आढावा घेतला जातो.सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४३.७ टक्के लोकांना सध्याची रोजगारविषयक स्थिती पराकोटीची वाईट आहे, असे वाटते.

टॅग्स :अर्थव्यवस्थाभारतीय रिझर्व्ह बँक