Join us  

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शोधात भारताने पुढे यावे- असोचेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 1:49 AM

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शोधकार्यात भारताने अग्रेसर देशांसोबत सहयोगाने पुढे जायला हवे, असे मत असोचेमने व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शोधकार्यात भारताने अग्रेसर देशांसोबत सहयोगाने पुढे जायला हवे, असे मत असोचेमने व्यक्त केले आहे. सामाजिक आणि आर्थिक आव्हाने पेलण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि विज्ञान व तंत्रज्ञानासारख्या विभागांनी ब्रिटन, जर्मनी, सिंगापूर, इस्रायल आणि चीनसारख्या देशांसोबत पुढे यायला हवे, असे मतही असोचेमने व्यक्त केले आहे.असोचेमने ब्रिटनच्या पीडब्ल्यूसीसोबत केलेल्या एका अभ्यासाच्या आधारे हे मत व्यक्त केले आहे. ‘भारताच्या आर्थिक परिवर्तनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सचा वापर’ या विषयावर हे अध्ययन होते. सार्वजनिक क्षेत्रातील योजना जसे की, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्किल इंडिया या योजनांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सचा उपयोग केला जाऊ शकतो.कृत्रिम बुद्धिमत्तेत आवड निर्माण व्हावी, यासाठी माध्यमिक विद्यालय आणि विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमात बदल करून या विषयाचा अंतर्भाव करता येईल. डिजिटल डेटा बँकांची स्थापना करण्यासारखे उपक्रम राबविता येतील.