Join us

पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन

By admin | Updated: August 27, 2014 21:30 IST

सावरगाव (पी): मुखेड तालुक्यातील सांगवी ग्रामपंचायतच्या वतीने दीड कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून या योजनेचे उद्घाटन जि. प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास बार्‍हाळीचे सरपंच राजन देशपांडे, शौकतखान पठाण, कार्यकारी अभियंता डी. एस. डाकोरे, गटविकास अधिकारी व्ही. बी. कांबळे, सुशील पत्की, किशोर चौहाण, दत्तात्रय कांबळे, उपअभियंता कल्याणकर यांची उपस्थिती होती.

प्रारंभी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सरपंच महेंद्र देशमुख यांनी मान्यवरांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. इतर मान्यवरांचे स्वागत गावकर्‍यांनी केले. यावेळी उपसरपंच मनिषा देशमुख, चेअरमन जाधव करडखेले, तंटामुक्त अध्यक्ष विश्वनाथ चावरे, ग्रा. पं. सदस्य मिलिंद जोंधळे, एकनाथ यल्लेवाड, सूर्यकांत मस्कले, मन्मथ मठपती, दयानंद गंगावणे, अमोल धनवाडे, नामदेव गंगावणे, सतीश धनवाडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)