महत्त्वाचे- एस.टी कर्मचारी
By admin | Updated: September 5, 2014 23:28 IST
महत्त्वाचे- एस.टी कर्मचारी
एसटी कर्मचार्यांसाठी ‘आरक्षण एक्स्प्रेस’!‘बंपर’धमाका : कामगार, कर्मचार्यांसाठी तीन महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी एसटी महामंडळाने कामगार व कर्मचार्यांसाठी तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. एसटीत नव्याने होणार्या भरतीत कर्मचार्यांच्या पाल्यांना 5 टक्के आरक्षणास तत्वत: मंजुरी, अपघात झाल्यास पाल्यांना अनुकंपातत्वावर नोकरी आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचारी व अधिकार्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीस किंवा पतीस दोन महिन्यांचा मोफत पास असे निर्णय शुक्रवारी एसटी महामंडळाच्या बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आले. पोलिसांच्या मुलांना सरळ सेवा भरतीत पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय नुकताच झाला होता. त्याआधारे एसटीत यापुढे नव्याने होणार्या नोकर भरतीत पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी कामगार वर्गाकडून झाली होती. त्यावर अभ्यास करून शुक्रवारी प्रस्तावाला तत्वत: मंजुरी देण्यात आली. कायदेशीर बाबींची पुर्तता करुन हा प्रस्ताव राज्य सरकारकडे लवकरच पाठवला जाईल. या निर्णयाबरोबरच चालक-वाहक आणि मॅकेनिकसारखा मोठा कामगार वर्गालाही दिलासा देणारा निर्णय महामंडळाने घेतला आहे. चालक-वाहक किंवा मॅकेनिक यांना कामावर असताना अपघात झाला आणि ते शारिरीक, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरल्यास त्यांच्या पाल्यांना अनुकंपातत्वावर नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वी हा निर्णय फक्त मृत्यू झालेल्या चालक-वाहक आणि मॅकेनिक यांच्यासाठी लागू होता, असे एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी सांगितले. वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या व स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचार्यांच्या किंवा अधिकार्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विधवा किंवा विदुर यांना दोन महिन्यांचा मोफत पास देण्यात येणार आहे. अनुकंपातत्वावर नोकरी आणि मोफत पास याची अंमलबजावणीही त्वरीत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)-----------------------भाडेवाढीचा फेरविचार1 सप्टेंबरपासून डिझेलच्या किंमतीत देशभरात 50 पैसे आणि राज्यात 63 पैशांनी वाढ झाल्यामुळे महामंडळाने 1.89 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र या प्रस्तावावर आता फेरविचार केला जात असल्याचेही गोरे म्हणाले. ----------------------कामगार संघटनांकडून स्वागतएसटी महामंडळाच्या निर्णयाचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे नेते हनुमंत ताटे आणि महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस र्शीरंग बरगे यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाची एक लाखाहून अधिक कर्मचार्यांना आरक्षणाचा फायदा होईल. ------------------