मस्ट -शिक्षकांच्या उपक्रमांना लाभणार आयआयएमचे पंख
By admin | Updated: August 16, 2014 22:24 IST
ही बातमी सर्व आवृत्त्यांनी आतील पानात वापरणे मस्ट आह़े
मस्ट -शिक्षकांच्या उपक्रमांना लाभणार आयआयएमचे पंख
ही बातमी सर्व आवृत्त्यांनी आतील पानात वापरणे मस्ट आह़े ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़फोटो16 राजेंद्र बाबू या नावाने पाठविण्यात आला आह़े फोटो ओळकराराचे आदानप्रदान करताना शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी भिडे आणि आयआयएम; अहमदाबादचे व्यवस्थापक अविनाश भंडारी. ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़शिक्षकांच्या उपक्रमांना लाभणार आयआयएमचे पंखमुंबई : अनेकदा अनेक शिक्षक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवितात. अशा उपक्रमांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि आयआयएम (इंडियन इन्स्टिट्यूटस् ऑफ मॅनेजमेंट) अहमदाबाद यांच्यात एक महत्त्वपूर्ण करार अलिकडेच मुंबईत झाला. शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या या करारावर विभागाच्या सचिव अश्विनी भिडे आणि विद्या परिषदेचे संचालक एन.के.जरग यांनी तर आयआयएम अहमदाबादच्या वतीने व्यवस्थापक (इनोव्हेशन) अविनाश भंडारी यांनी स्वाक्षर्या केल्या. या करारांतर्गत आयआयएम अहमदाबादच्या वतीने एमएससीईआरटी, डाएट आणि शिक्षकांना नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. या उपक्रमांची गुणवत्ता आणि उपयोगिता तपासणे, त्यांना व्यापक प्रमाणात प्रसिद्धी देऊन शिक्षकांना प्रोत्साहित करणे, पोर्टल तयार करणे, नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणार्या शिक्षकांचे जाळे निर्माण करणे, काही उपक्रमांच्या आधारे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाला शिफारस करणे यासाठी हा करार करण्यात आला आहे. या करारामुळे शिक्षकांना प्रगतीचे नवे क्षीतिज मिळेल, असा विश्वास राजेंद्र दर्डा यांनी यावेळी व्यक्त केला. (विशेष प्रतिनिधी)