Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI Offer : कोणत्याही कागदपत्रांशिवाय स्टेट बँक देतेय पर्सनल लोन; कमी व्याजदर, बँकेत जाण्याचीही गरज नाही

SBI Offer : कोणत्याही कागदपत्रांशिवाय स्टेट बँक देतेय पर्सनल लोन; कमी व्याजदर, बँकेत जाण्याचीही गरज नाही

SBI Personal Loan : जर तुम्हाला आपात्कालिन परिस्थितीत पैशांची गरज असेल आणि जर तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 12:12 PM2021-12-10T12:12:26+5:302021-12-10T12:12:46+5:30

SBI Personal Loan : जर तुम्हाला आपात्कालिन परिस्थितीत पैशांची गरज असेल आणि जर तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे.

How to avail pre approved SBI personal loan on YONO app in 4 steps | SBI Offer : कोणत्याही कागदपत्रांशिवाय स्टेट बँक देतेय पर्सनल लोन; कमी व्याजदर, बँकेत जाण्याचीही गरज नाही

SBI Offer : कोणत्याही कागदपत्रांशिवाय स्टेट बँक देतेय पर्सनल लोन; कमी व्याजदर, बँकेत जाण्याचीही गरज नाही

जर तुम्हाला आपात्कालिन परिस्थितीत पैशांची गरज असेल आमि जर तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. तुम्ही केवळ चार क्लिकमध्ये प्री-अप्रुव्ह्ड पर्सनल लोन (Personal Loan) घेऊ शकता. स्टेट बँकेच्या (State Bank Of India) ग्राहकांसाठी चोवीस तास ही सेवा उपलब्ध आहे. पाहा तुम्हाला कसा करता येईल यासाठी अर्ज.

कशी आहे प्रक्रिया?

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाइलमध्ये YONO अॅप डाऊनलोड करुन लॉग इन करा.
  • त्यानंतक Click on Avail Now वर क्लिकर करा. 
  • लोनची रक्कम आणि त्याचा कालावधी निवडा.
  • तुमच्या रजिस्टर मोबाइलवर एक ओटीपी येईल तो त्या ठिकाणी टाका.
  • लोन कोणाला मिळू शकेल, हे पडताळून पाहण्यासाठी तुम्हाला "PAPL" असं टाइप करून 567676 वर पाठवावं लागेल.


काय आहे विशेष?

  • या लोनचा व्याजदर ९,६० टक्क्यांपासून सुरू होतो.
  • Festive Offer: ३१ जानेवारी २०२२ पर्यंत प्रोसेसिंग चार्जवर १०० टक्केसूट देण्यात येणार आहे.
  • केवळ चार क्लिकमध्ये लोन प्रोसेसिंगचे पैसे तुमच्या खात्यात येतील.
  • यासाठी कोणत्याही प्रकारच्या डॉक्युमेंट्सची गरज भासणार नाही.
  • योनोच्या माध्यमातून हे २४ तास उपलब्ध असेल.
  • यासाठी कोणत्याही ग्राहकाला बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही.
     

गेल्या महिन्यात SBI नं YONO वर प्री अप्रुव्ह्ड टू व्हिलर लोन 'SBI Easy Ride' लाँच केलं होतं. हेदेखील बँकेच्या शाखेत न जाता अॅपच्या माध्यमातून एन्ट टू एन्ड पेपरलेस प्रक्रियेच्या माध्यमातून घेतलं जाऊ शकतं.

Web Title: How to avail pre approved SBI personal loan on YONO app in 4 steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.