Home Loan EMI: जर तुम्ही स्वतःचं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहत असाल आणि त्यासाठी होम लोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सध्या बँक ऑफ महाराष्ट्र केवळ ७.१०% च्या सुरुवातीच्या व्याजदरानं होमलोन देत आहे.
पण प्रश्न असा आहे की, ₹८० लाख कर्ज घेण्यासाठी तुमचा मासिक पगार किती असावा आणि त्या कर्जावर तुमचा मासिक ईएमआय किती होईल? तुम्हाला किती पगाराची आणि ईएमआय प्लॅनची आवश्यकता असेल, जेणेकरून तुम्ही कोणत्याही आर्थिक दबावाशिवाय तुमच्या नवीन घरात प्रवेश करू शकाल हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
सुरुवातीचा दर म्हणजे सर्वात स्वस्त होम लोन
होम लोन किंवा कोणत्याही कर्जाचा जो सुरुवातीचा व्याज दर बँक ऑफर करते, तो तिचा सर्वात स्वस्त व्याज दर असतो. या दरानं कर्ज त्या ग्राहकाला सहज मिळू शकते, ज्याचा सिबिल स्कोर (CIBIL Score) ८०० किंवा त्याहून अधिक असतो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ती सध्या ७.१० टक्के च्या सुरुवातीच्या दरानं होमलोन ऑफर करत आहे. अशा परिस्थितीत, जर तुमचा सिबिल स्कोर (३०० ते ९०० दरम्यान मोजला जातो) उत्कृष्ट असेल, तर तुम्ही होमलोनसाठी अर्ज करू शकता.
₹८० लाख कर्जासाठी किती असावा पगार?
होम लोनसाठी पात्रता तुमचं मासिक उत्पन्न, वय, सिबिल स्कोर आणि कर्जाच्या कालावधीवर अवलंबून असते. जर तुम्ही उत्कृष्ट सिबिल स्कोरसह २० वर्षांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून ₹८० लाख होम लोनसाठी अर्ज करत असाल, तर ७.१०% व्याजदराच्या आधारावर, तुमच्या पगारची गणना केल्यास, तुमचं किमान मासिक वेतन (Minimum Monthly Salary) ₹१,१३,७०० इतकं असलं पाहिजे. जर तुम्ही १५ वर्षांसाठी कर्ज घेऊ इच्छित असाल, तर तुमचा किमान पगार ₹१,३१,६०० असावा. जर तुम्ही २५ वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज घेऊ इच्छित असाल, तर तुमचा किमान पगार ₹१,०३,८०० असावा.
किती असेल ईएमआय?
बँक ऑफ महाराष्ट्रच्या होम लोन कॅल्क्युलेटरनुसार, २० वर्षांच्या कर्ज परतफेड कालावधीसाठी ७.१०% व्याजदराच्या आधारावर ८० लाख रुपयांच्या होम लोनचा ईएमआय ₹६२,५०५ इतका बनेल. या आधारावर, तुम्ही होम लोनच्या रकमेव्यतिरिक्त फक्त ₹७०,०१,२०६ इतके व्याज भराल. बँकेला एकूण ₹१,५०,०१,२०६ परत करावे लागतील. जर तुम्ही १५ वर्षांसाठी कर्ज घेतले, तर मासिक हप्ता ₹७२,३५४ बनेल. जर तुम्ही २५ वर्षांसाठी कर्ज घेतले, तर मासिक हप्ता ₹५७,०५४ असेल.
एकूणच, हे समजून घ्या की कर्ज फेडण्याची मुदत जेवढी कमी असेल, तेवढं व्याज कमी भरावं लागेल. कर्ज फेडण्याची मुदत जेवढी जास्त असेल, तेवढं व्याज जास्त भरावं लागेल. शक्य असल्यास कमी कालावधीच्या होम लोनची निवड करणं शहाणपणाचा निर्णय ठरू शकतो.
