नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) १७९ दिवसांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात अर्ध्या टक्क्याची कपात केली आहे. ७ ते १७९ दिवसांच्या मुदत ठेवीवरील व्याज दर ७.५ टक्क्यांवरून ७ टक्के करण्यात आला आहे. १८ जुलैपासून नवे व्याजदर लागू होतील. एक कोटीपेक्षा जास्त रकमेच्या मुदत ठेवींवरील व्याज दरांचे दोन टप्पे करण्यात आले आहेत. पहिला टप्पा ७ ते ६0 दिवसांचा असून या वरील व्याजदर 0.२५ टक्के कमी करून ६.२५ टक्के करण्यात आला आहे.
एसबीआयच्या व्याजदरात अर्ध्या टक्क्याची कपात
By admin | Updated: July 16, 2014 01:46 IST