Join us  

पाच कोटींच्या आतील करदात्यांना जीएसटीचा दिलासा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 2:19 AM

१२ जूून २०२० रोजी जीएसटी परिषदेची ४० वी बैठक निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये कायदा आणि कार्यपद्धतींच्या बदलांमध्ये कोणत्या शिफारशी ठेवण्यात आल्या?

- सीए - उमेश शर्माअर्जुन : कृष्णा, १२ जूून २०२० रोजी जीएसटी परिषदेची ४० वी बैठक निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये कायदा आणि कार्यपद्धतींच्या बदलांमध्ये कोणत्या शिफारशी ठेवण्यात आल्या?कृष्ण : अर्जुना, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून १२ जून २०२० रोजी जीएसटी परिषदेची बैठक घेण्यात आली. जीएसटी परिषदेत व्यापार सुलभतेच्या उपाय-योजनांसाठी शिफारशी केल्या आहेत. ज्यात मागील रिटर्न्ससाठी लेट फी कमी करणे, लहान करदात्यांकरिता मदतीचे उपाय आणि नोंदणी रद्द करण्यासाठीची मागणी करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे.अर्जुन : कृष्णा, मागील रिटर्न्ससाठी लेट फी कमी करण्याची शिफारस काय आहे?कृष्ण : अर्जुना, रिटर्न फाईलिंगमधील पेंडन्सी संपवण्यासाठी एक मार्ग म्हणून, फॉर्म जीएसटीआर-३बी वरील लेट फीसाठी जुलै २०१७ (जीएसटी कालावधीची सुरुवात) ते जानेवारी २०२० पर्यंतसाठीची कमी किंवा माफ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. ती अशी-‘कर देय नसेल’ तर ‘शून्य लेट फी’ (म्हणजेच कर देय नसल्यास लेट फी नाही.)कर देय असेल तर जास्तीत जास्त ५०० रुपये लेट फी.(टीप : कमी केलेला लेट फीचा दर जुलै २०१७ ते सप्टेंबर २०२० दरम्यानच्या जीएसटीआर ३ बी साठी लागू असेल, अशी शिफारसदेखील करण्यात आली आहे.)अर्जुन : कृष्णा, लहान करदात्यांना दिलासा देण्याकरिता काय शिफारस केली आहे?कृष्ण : अर्जुना, लहान करदाते म्हणजे असे करदाते ज्यांची उलाढाल ५ कोटींपेक्षा कमी आहे. त्यांच्याकरिता खालील दिलाशाच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत.फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल २०२० या कालावधीसाठी उशिरा रिटर्न भरण्यासाठी दिलासा :- या महिन्यांसाठी रिटर्न उशिरा भरल्यास अधिसूचित तारखेपर्यंत व्याज लागणार नाही (६ जुलै २०२० पर्यंत मुदत) आणि ३०/९/२०२० पर्यंत वार्षिक व्याजदर १८ टक्क्यांवरून ९ टक्के करण्यात आला आहे.मे, जून, जुलै २०२० या कालावधीसाठी दिलासा : कोविड-१९ साथीचा देशभर फैलाव झाल्यामुळे लहान करदात्यांना लेट फी आणि व्याज माफ करून दिलासा मिळू शकेल.जर जीएसटीआर ३ बी मे, जून, जुलै२०२० करिता सप्टेंबर २०२० पर्यंत भरले तर (मुदत दिनांक अद्याप कळू शकली नाही.)अर्जुन : कृष्णा, नोंदणी रद्द करण्यासाठीच्या शिफारशीकोणत्या ?कृष्ण : अर्जुना, ज्या करदात्यांची नोंदणी १२ जून २०२० पर्यंत रद्द करण्यात आली आणि नोंदणी रद्द करण्यासाठीचे फॉर्म मागे घेण्याची संधी करदात्यास दिली आहे. ही संधी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत दिली जाऊ शकते.अर्जुन : कृष्णा, यामधून काय बोध घेता येईल?कृष्ण : अर्जुना, निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, जीएसटीचे संकलन ४५ टक्क्यांनी घसरले आहे. ज्यामुळे राज्यांना नुकसानभरपाईची समस्या उद्भवलीआहे. तसेच राज्यांनी बाजारपेठातून पैसे देण्याची मागणी केली आहे. यावर जुलैमध्ये परिषद घेण्यात येईल.अर्जुन : कृष्णा, ४० व्या जीएसटी परिषदेत कोणते मुद्दे स्पष्ट झाले नाहीत?कृष्ण : अर्जुना, जीएसटी परिषदेत खालील मुद्दे स्पष्ट झाले नाहीत : १) जर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल २०२० या कालावधीसाठी लेट फी काय असेल. जर रिटर्न ६ जुलै २०२० नंतर परंतु ३० सप्टेंबर २०२० पर्यंत दाखल केले तर ? २) जीएसटीआर-१ साठी काहीही स्पष्ट केलेले नाही. ३) टीडीएस आणि टीसीएस रिटर्नबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. ४) ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या करदात्यांकरिता कोणताही दिलासा नाही. ५) ज्या करदात्यांनी लेट फी भरली असेल त्यांच्याबद्दल काय? ते स्पष्ट केलेले नाही.

टॅग्स :जीएसटी