Join us

तरुणीशी अश्लील वर्तणूक करणारा गजाआड

By admin | Updated: September 4, 2015 21:54 IST

तरुणीशी अश्लील वर्तणूक करणारा गजाआड

तरुणीशी अश्लील वर्तणूक करणारा गजाआड
सायन पोलिसांची कामगिरी
मुंबई: एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीचा पाठलाग करुन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणार्‍या तरुणाच्या सायन पोलिसांनी मुसक्या आवळल्या. गेल्या पाच वर्षांपासून कोळी तरुणीच्या मागावर होता. फ्रान्सिको कोळी (२७) असे आरोपीचे नाव असून विनयभंगाच्या गुन्ह्यात सायन पोलिसांनी त्याला अटक केली.
मुळची धारावी परिसरात राहणार्‍या तक्रारदार तरुणीवर कोळीचे एकतर्फी प्रेम होते. तरुणीचा पाठलाग करुन तो तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. तब्बल पाच वर्षे कोळीचा त्रास सहन करत असलेल्या तरुणीने धारावी येथील घर सोडून सायन परिसरात राहण्यास आली. बुधवारी कोळीने पुन्हा तरुणीचा शोध घेत तिच्यासोबत अश्लील वर्तणूक करत तिला मारहाण केली.
अखेर कोळीचा अत्याचाराला कंटाळलेल्या तरुणीने सायन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन सायन पोलिसांनी कोळीच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती सायन पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)