Join us  

खादी ग्रामोद्योगाला वर्षभरात येणार अच्छे दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 3:47 AM

खादी व ग्रामोद्योग आयोगाला अच्छे दिन आले आहेत.

नवी दिल्ली : खादी व ग्रामोद्योग आयोगाला अच्छे दिन आले आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हर, पतंजली या बड्या कंपन्यांपेक्षा खादी व ग्रामोद्योग आयोगामार्फत होणाऱ्या विक्रीत वर्षभरात तब्बल २५ टक्के वाढ झाली आहे. अधिकाधिक लोक खादीच्या उत्पादनांकडे वळत असल्याचा हा परिणाम आहे.आतापर्यंत खादी म्हटल्यावर लोकांना केवळ कापड, उदबत्त्या, साबण हीच उत्पादने डोळ्यांसमोर येतात. या उत्पादनांची मागणी तर वाढली आहेच; पण सौंदर्य प्रसाधनांसाठीही खादी उत्पादनांचीच निवड वाढत आहे. खादीकडील पापड, मध या वस्तूही अधिक वापरल्या जात आहेत. त्यामुळेच खादी व ग्रामोद्योग आयोगाचा नफा २0१८-१९ या काळात वाढला, असे सांगण्यात येते.खादी व ग्रामोद्योग आयोगाने गेल्या काही वर्षांत कात टाकली असून, त्यांच्या दुकानांमध्ये घरगुती वापराच्या अनेक वस्तू दिसू लागल्या आहेत. या वस्तू घरोघरी महिलांनी बनविलेल्या असतात आणि त्यामुळे त्या विकत घेण्याकडे कल वाढत आहे. शिवाय खादीने अतिशय फॅशनेबल तयार कपडेही विक्रीस आणले असून, तेही लोकप्रिय ठरले आहेत.

टॅग्स :खादीअर्थव्यवस्था