Join us

सोने स्थिर; चांदी मात्र मजबूत

By admin | Updated: May 31, 2014 06:28 IST

औद्योगिक मागणीत वाढ झाल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी चांदीचा भाव ३५० रुपयांच्या तेजीसह ४०,८५० रुपये प्रतिकिलो झाला

नवी दिल्ली : औद्योगिक मागणीत वाढ झाल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी चांदीचा भाव ३५० रुपयांच्या तेजीसह ४०,८५० रुपये प्रतिकिलो झाला. दुसरीकडे सलग घसरत असलेल्या सोन्याचा भाव २७,५०० रुपये प्रतितोळ््यावर स्थिर राहिला. तयार चांदीचा भाव ३५० रुपयांनी वाढून ४०,८५० आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ६० रुपयांनी सुधारून ४०,०५० रुपये प्रतिकिलो झाला. चांगली मागणी मिळाल्याने चांदीच्या शिक्क्यांचा भाव दोन हजार रुपयांनी वाढून ७७,००० ते ७८,००० रुपये प्रतिशेकडा या पातळीवर आला. ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर स्थिरावला. अनुक्रमे २७,५०० आणि २७,३०० रुपये प्रतितोळ््यावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क) सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव ०.१७ टक्क्यांच्या घसरणीसह १२५३.८० डॉलर प्रतिऔंस झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,६०० रुपयांवर कायम राहिला.