नवी दिल्ली : जागतिक बाजारातील बळकट स्थिती असतानाही गुरुवारी सोन्याचा भाव मर्यादित खरेदीने २७,६५० रुपये प्रति १० ग्रॅमवर स्थिर राहिला. तथापि, चांदीचा भाव २५५ रुपयांच्या सुधारणेसह ३९,३५५ रुपये प्रतिकिलो राहिला. बाजारातील जाणकारांनी सांगितले की, मर्यादित खरेदीमुळे सोन्याचा भाव स्थिर पातळीवर राहण्यास मदत झाली. जागतिक बाजारातील तेजीमुळे बाजार धारणेस काहीशी चालना मिळाली. सिंगापूर येथे सोन्याचा भाव १,२१०.१५ डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भाव ०.४ टक्क्यांनी वधारून १७.१८ डॉलर प्रतिऔंस झाला. दुसरीकडे तयार चांदीचा भाव २५५ रुपयांनी वाढून ३९,३५५ रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव २१० रुपयांनी उंचावून ३९,२०० रुपये प्रतिकिलो झाला. तथापि, चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५८,००० रुपये व विक्रीकरिता ५९,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मर्यादित खरेदीमुळे सोने स्थिर; चांदी तेजीत
By admin | Updated: May 21, 2015 23:30 IST