Join us  

सोने घसरले; चांदी मजबूत

By admin | Published: June 26, 2014 10:13 PM

सराफा व्यापा:यांची मागणी कमी पडल्याने गुरुवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 5क् रुपयांनी घसरून 28,66क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पाश्र्वभूमीवर उच्च पातळीवर सराफा व्यापा:यांची मागणी कमी पडल्याने गुरुवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 5क् रुपयांनी घसरून 28,66क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. दुसरीकडे चांदीचा भाव मात्र, 2क्क् रुपयांनी वधारून 45,क्क्क् हजार रुपये प्रतिकिलो झाला. गेल्या 21 मार्चनंतर प्रथमच चांदीच्या भावाने ही पातळी गाठली आहे.
लंडनमध्ये सोन्याचा भाव क्.6 टक्क्यांनी कमी होऊन 1311.65 डॉलर प्रतिऔंस राहिला. दिल्लीतच 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 5क् रुपयांनी कमी होऊन अनुक्रमे 28,66क् आणि 28,46क् रुपये प्रति दहा ग्रॅम राहिला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव मर्यादित व्यवहारामुळे 24,9क्क् रुपयांवर कायम राहिला. तयार चांदीचा भाव 2क्क् रुपयांच्या तेजीसह 45,क्क्क् रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही 31क् रुपयांनी उंचावून 44,53क् रुपये प्रतिकिलो झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)