Join us

सोने 140 रुपयांनी उतरले; चांदी स्थिर

By admin | Updated: July 9, 2014 01:03 IST

राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव 14क् रुपयांनी कमी होऊन 28,क्6क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थिती आणि रेल्वे अर्थसंकल्प यांच्या पाश्र्वभूमीवर स्टॉकिस्टांनी सातत्याने विक्री केल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव 14क् रुपयांनी कमी होऊन 28,क्6क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. दुसरीकडे औद्योगिक संस्था आणि नाणो निर्मात्यांकडून किरकोळ मागणीमुळे चांदीचा भाव 44,9क्क् रुपये प्रतिकिलोवर कायम राहिला.
बाजारातील सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारात कमजोर स्थिती होती. परिणामी सोन्याच्या विक्रीवरील दबाव वाढला. याचा बाजार धारणोवर प्रतिकूल परिणाम झाला. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत झाल्याने सोने आयात स्वस्त झाली. रेल्वे अर्थसंकल्पाकडून निराशा झाल्याची प्रतिक्रिया बाजारात उमटली.
सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव क्.2 टक्क्यांनी कमी होऊन 1316.8क् डॉलर प्रतिऔंस झाला. 
दिल्ली बाजारातच 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 14क् रुपयांनी कमी होऊन अनुक्रमे 28,क्6क् रुपये आणि 27,86क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 1क्क् रुपयांनी कमी होऊन 24,8क्क् रुपयांवर बंद झाला.
तयार चांदीचा भाव 44,9क्क् रुपये प्रतिकिलोवर कायम राहिला. दुसरीकडे चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव 15 रुपयांच्या सुधारणोसह 44,725 रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी 79,क्क्क् रुपये आणि विक्रीसाठी 8क्,क्क्क् रुपये प्रतिशेकडय़ावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)