नवी दिल्ली : साठेबाजांनी सणासुदीची खरेदी केल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव २० रुपयांनी वधारून २८,३७० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात ही वाढ नोंदली गेली. तिकडे चांदीचा भाव ४४,८०० रुपये प्रतिकिलोवर कायम राहिला.स्टॉकिस्ट आणि व्यापाऱ्यांनी सणासुदीची मागणी पूर्ण करण्यासाठी खरेदी केल्याने सोन्याचा भावात ही वाढ नोंदली. मात्र, जागतिक बाजारातील कमजोर संकेतांमुळे ही वाढ मर्यादित राहिली. जागतिक सराफा बाजारात घसरणीचा कल होता. सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.४ टक्क्यांनी कमी होऊन १,३०१.४९ डॉलर प्रतिऔंस झाला.दिल्ली बाजारातच ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २० रुपयांनी वाढून अनुक्रमे २८,३७० रुपये व २८,१७० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. यामध्ये सोमवारी २५० रुपयांनी वाढ झाली होती. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,९०० रुपयांवर कायम राहिला. तयार चांदीचा भाव ४४,८०० रुपये प्रतिकिलोवर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्याचा भाव अल्पसा वधारला
By admin | Updated: July 29, 2014 01:44 IST