Join us

लग्नसराईच्या खरेदीने सोन्याचा भाव तेजीत!

By admin | Updated: January 12, 2015 23:45 IST

लग्नसराईच्या खरेदीने सोमवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात तेजी नोंदली गेली. सोन्याचा भाव २३० रुपयांनी उंचावून २७,४८० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला

नवी दिल्ली : लग्नसराईच्या खरेदीने सोमवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात तेजी नोंदली गेली. सोन्याचा भाव २३० रुपयांनी उंचावून २७,४८० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांच्या मागणीने चांदीचा भावही ४०० रुपयांनी वाढून ३७,२५० रुपये प्रतिकिलो राहिला. सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले की, लग्नसराईच्या काळातली मागणी पूर्ण करण्यासाठी आभूषण निर्माते व रिटेलर्स यांनी जोरदार खरेदी केली. दुसरीकडे जागतिक बाजारात सोन्याचा भाव महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला. याचाही बाजार धारणा सुधारणेस हातभार लागला.जागतिक पातळीवर सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव ०.७ टक्क्यांनी वधारून १२३१.२९ डॉलर प्रतिऔंस या विक्रमी पातळीवर गेला. गेल्या ११ डिसेंबर रोजीच्या पातळीला सोन्याच्या भावाने स्पर्श केला. चांदीचा भावही ०.७ टक्क्यांनी वाढून १६.६१ डॉलर प्रतिऔंस झाला. तयार चांदीचा भावही ४०० रुपयांनी वाढून ३७,२५० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ४१५ रुपयांच्या तेजीसह ३७,२४५ रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ६१,००० रुपये व विक्रीकरिता ६२,००० रुपये प्रतिशेकड्यावर राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)