नवी दिल्ली : सोन्याच्या दरात बुधवारी आणखी 20 रुपयांची घसरण झाली. त्याबरोबर राजधानी दिल्लीत सोने 26,880 रुपये तोळा झाले. चांदीचा भाव मात्र 175 रुपयांनी वाढून 37,200 रुपये किलो झाला.
बाजारातील सूत्रंनी सांगितले की, दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांच्याकडून सोन्याला असलेली मागणी कमी झाली आहे. त्यातच जागतिक बाजारात नरमाईचा कल आहे. त्यामुळे सोन्याला मरगळ आली आहे. दुसरीकडे चांदीला औद्योगिक क्षेत्रकडून चांगली मागणी आहे. चांदीचे शिक्के बनविणा:यांकडूनही मागणी आहे. त्यामुळे चांदी तेजीत आहे. शेअर्सचे भाव रोज वाढत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पैसा तिकडे वळविला आहे. त्याचा परिणाम म्हणून सराफा बाजारात मंदी सुरू झाली आहे. भारतातील भाव निश्चित करणा:या सिंगापुरातील बाजारात सोन्याचा भाव घसरला आहे. 1,200.09 डॉलर प्रतिऔंस असा तेथील बुधवारचा भाव होता.
तयार चांदीचा भाव 175 रुपयांनी वाढून 37,200 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव 165 रुपयांनी वाढून 36,620 रुपये किलो झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्राजधानी दिल्लीत 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 20 रुपयांनी घसरून अनुक्रमे 26,880 रुपये आणि 26,680 रुपये तोळा राहिला. सोन्याच्या आठ ग्रामच्या गिन्नीचा भाव आदल्या दिवशीच्या पातळीवर 23,800 रुपये असा कायम राहिला.