Join us

सोने उतरले

By admin | Updated: October 29, 2015 21:27 IST

सतत दोन दिवस झालेली दरवाढ खंडित करीत आज मागणीअभावी सोने दहा ग्रॅममागे १९० रुपयांनी घसरले. त्यामुळे येथील बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव २७,०७५ रुपये झाला

नवी दिल्ली : सतत दोन दिवस झालेली दरवाढ खंडित करीत आज मागणीअभावी सोने दहा ग्रॅममागे १९० रुपयांनी घसरले. त्यामुळे येथील बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव २७,०७५ रुपये झाला. मात्र, दुसरीकडे चांदीचे भाव किलोमागे १५ रुपयांनी वाढून ३७,३६५ रुपये झाला.दिवाळी तोंडावर आलेली असतानाही व्यापाऱ्यांनी सोने खरेदी केली नाही. जागतिक बाजारपेठेतही सोन्याचे भाव ०.९७ टक्क्याने घसरून ११५५.७० प्रति औंस झाले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही सोन्याचे भाव १९० रुपयांनी घसरून अनुक्रमे २७,०७५ आणि २६,९२५ रुपये प्रति १० ग्रॅम झाले. विशेष म्हणजे गेल्या दोन सत्रांत सोने १९५ रुपयांनी वधारले होते.