Join us

सोने १३० रुपयांनी स्वस्त

By admin | Updated: June 18, 2014 05:33 IST

गेल्या सहा दिवसांपासून सातत्याने महाग होत असलेल्या सोन्याचा भाव मंगळवारी १३० रुपयांनी घसरून २७,९०० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला

नवी दिल्ली : गेल्या सहा दिवसांपासून सातत्याने महाग होत असलेल्या सोन्याचा भाव मंगळवारी १३० रुपयांनी घसरून २७,९०० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या उच्च पातळीवरील सोन्याच्या मागणीत घट झाल्याने राजधानी दिल्लीच्या बाजारात हा कल दिसून आला.चांदीचा भावही औद्योगिक संस्था आणि नाणेनिर्मात्यांच्या कमजोर मागणीमुळे ४०० रुपयांनी कमी होऊन ४२,६०० रुपये प्रतिकिलो झाला. बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारात कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर या मौल्यवान धातूंच्या मागणीत घट नोंदली गेली. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हची धोरणात्मक बैठक दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना बाजारात हा कल नोंदला गेला.सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव ०.७ टक्क्यांनी कमी होऊन १,२६३.५८ डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भावही ०.४ टक्क्यांनी घसरून १९.५८ डॉलर प्रतिऔंस राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)