Join us  

सोने तेजीत; चांदीत घट

By admin | Published: December 30, 2014 1:07 AM

जागतिक बाजारात घसरण सुरू असतानाच राजधानी दिल्लीच्या सराफ्यात मंगळवारी सोन्याचा भाव ११० रुपयांनी वाढून २७,२१० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

नवी दिल्ली : जागतिक बाजारात घसरण सुरू असतानाच राजधानी दिल्लीच्या सराफ्यात मंगळवारी सोन्याचा भाव ११० रुपयांनी वाढून २७,२१० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तथापि, चांदीचा भाव औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांकडून मागणी घटल्याने ३७,२५० रुपये प्रतिकिलो राहिला.बाजारातील जाणकारांनी सांगितले की, ग्राहकांची लग्नसराईच्या काळातली मागणी पूर्ण करण्यासाठी ज्वेलर्स व रिटेलर्स यांनी सोन्याची खरेदी केली; मात्र जागतिक बाजारात घसरणीचा कल राहिल्याने या मौल्यवान धातूचीही मागणी मर्यादित राहिली. सिंगापुरात सोन्याचा भाव ०.३ टक्क्यांनी घटून १,१९२ डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला.राजधानी दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ११० रुपयांनी वधारून अनुक्रमे २७,२१० रुपये व २७,०१० रुपये प्रति १० ग्रॅमवर राहिला.