Join us  

निधी उभारणे झाले सोपे, एसएमईसाठी गुंतवणूक मर्यादा २ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 1:05 AM

लघू व मध्यम उद्योगांना भांडवली बाजारातून पैसा उभा करणे आता अधिक सोपे होणार आहे.

मुंबई : लघू व मध्यम उद्योगांना भांडवली बाजारातून पैसा उभा करणे आता अधिक सोपे होणार आहे. यासंबंधी किमान प्रारंभिक गुंतवणुकीची मर्यादा १० कोटींवरून २ कोटी रुपये करण्याचा निर्णय ‘सेबी’ने गुरुवारी घेतला. निधीची कमतरता हा लघू व मध्यम उद्योगांच्या (एसएमई) विस्तारातील सर्वात मोठा अडथळा असतो.अशा कंपन्यांना भांडवली बाजारातून निधी उभारता यावा यासाठी एसएमई एक्स्चेंज सुरू करण्यात आले. पण त्यामधील किमान प्रारंभिक गुंतवणुकीची मर्यादा अधिक असल्याने कंपन्यांना निधी उभारण्यात अडचण येत होती. त्यामुळेच आता त्यामध्ये८ कोटी रुपयांची घट करण्याचा निर्णय सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड आॅफ इंडियाच्या (सेबी) संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अजय त्यागी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.>विशेष केंद्र उभारणारकंपनी कायद्यातील ‘कलम ८’ अंतर्गत ‘चॅरिटी’ या उद्देशाने स्थापन झालेल्या लिमिटेड कंपन्यांसाठी ‘सेबी’ नॅशनल सेंटर फॉर फायनान्शिअल एज्युकेशन हे विशेष केंद्र उभारणार आहे. हे केंद्र सेबी, रिझर्व्ह बँक, इर्डा, पीएफआरडीए (निवृत्तिवेतन नियामक प्राधिकरण) संयुक्तपणे उभे करणार आहे.