Join us  

विमान कंपन्यांना इंधन दरवाढीचा फटका; १४,000 रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 3:24 AM

विमानासाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनामध्ये सातत्याने होणारी वाढ व रूपयाची सातत्याने होणारी घसरण यामुळे विमान कंपन्यांसमोरील आव्हानांमध्ये वाढ झाली आहे.

खलील गिरकरमुंबई : विमानासाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनामध्ये सातत्याने होणारी वाढ व रूपयाची सातत्याने होणारी घसरण यामुळे विमान कंपन्यांसमोरील आव्हानांमध्ये वाढ झाली आहे. वर्षभरात एक किलो दरात तब्बल १३ हजार ७९१ रूपयांची वाढ झाल्याने विमानकंपन्यांसमोर आव्हान उभे राहिले आहे. ही परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत नसल्याने विमान कंपन्यांच्या व्यवस्थापनासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे.हवाई वाहतुकीसाठी विमान कंपन्यांना वापराव्या लागणाºया इंधनाचा प्रति किलो लिटरचा दर मुंबईत ६४ हजार ९०१ रुपये आहे, विशेष म्हणजे हा दर देशात सर्वात कमी आहे. सर्वाधिक दर कोलकाता येथे ६९ हजार ८९७ रूपये आहे, दिल्लीमध्ये ६५ हजार ३४० रूपये तर चैन्नई मध्ये ६५ हजार ८९८ रूपये आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात हा दर मुंबईत ५१ हजार ११० रूपये होता. दिल्लीमध्ये ५१ हजार ६९६ रूपये, कोलकाता येथे ५६ हजार ४३० रूपये व चैन्नई येथे ५४ हजार ५०५ रूपये होता. मुंबईतील दरामध्ये एका वर्षात तब्बल १३ हजार ७९१ रूपयांची वाढ झाली आहे. चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी वापरल्या जाणाºया पेट्रोलच्या दरात मुंबई देशात सर्वात पुढे असताना जेट इंधनाच्या दरात मात्र देशात सर्वात कमी दर मुंबईत आहेत, हे विशेष.रूपयाच्या किंमतीतील वाढीव दराचा फटका कंपन्यांना बसला आहे. विमाने भाड्याने घेण्यासाठी, खरेदी करण्यासाठी व त्यांची देखरेख ठेवण्यासाठी परदेशी चलनाचा वापर करावा लागतो. एका डॉलरची किंमत गुरूवारी ६७.२० रूपये होती. तर, गतवर्षी एका डॉलरची किंमत ६४.६१ रूपये होती.आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना पुरवण्यात येणाºया इंधनाचे मुल्य डॉलरमध्ये घेतले जाते. मुंबईत प्रति किलो लिटरला ७१९ डॉलर, दिल्लीत ७०८ डॉलर, कोलकातामध्ये ७५३ डॉलर व चैन्नई मध्ये ६८९ डॉलर आकारले जातात. इंडियन आॅईल एव्हिएशन सेवेतर्फे देशात दर २४ तासांमध्ये तब्बल १७५० विमानांमध्ये इंधन भरले जाते.प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी अनेक विमान कंपन्यांनी विविध सवलती जाहीर केल्या होत्या त्यामुळे विमान कंपन्यांच्या प्रवाशांच्या संख्येत जानेवारी ते मार्च या कालावधीत मोठी वाढ झाली होती. विविध सवलतींमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झालेली असतानाही या समस्येमुळे विमान कंपन्यांच्या नफ्यामध्ये घट होऊ लागली आहे. गतवर्षीपेक्षा प्रवाशांची संख्या वाढलेली असली तरी उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने निव्वळ नफ्यामध्ये घट झाली आहे.