नवी दिल्ली : २0१६ या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याला चमक आली. नूतन वर्षाच्या पहिल्याच सत्रात सोने १२0 रुपयांनी वधारले. २५,५१0 रुपये प्रति १0 ग्रॅम असा भाव झाला. सराफा आणि व्यापाऱ्यांनी थोडीफार खरेदी केल्याने सोन्याचे भाव वाढल्याचे सांगण्यात आले.सोन्याचा भाव वाढला असला तरीही दुसरीकडे चांदीचा भाव मात्र ३३,३00 रुपये प्रति किलो असाच राहिला. राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या शुद्धतेच्या सोन्याचा भाव १0 ग्रॅममागे १२0 रुपयांनी वधारून अनुक्रमे २५,५१0 रुपये आणि २५,३६0 रुपये असा झाला. गुरुवारी सोने २६0 रुपयांनी घसरले होते.२0१५ या मावळलेल्या वर्षात सोन्याची मोठी घसरण झाली असून, गुंतवणूकदारांनी अन्य पर्यायांचा शोध सुरू केला आहे. पहिल्याच दिवशी सोने वधारले असले तरीही नवीन वर्षात काय होईल, हे सांगता येत नाही, असे बाजार विश्लेषकांनी सांगितले. चांदीचे भाव स्थिर असल्याने चांदीच्या नाण्याचेही भाव स्थिर राहिले. १00 नाण्यांच्या खरेदीचा दर ४६ हजार रुपये, तर विक्रीचा दर ४७ हजार स्थिर राहिला.
पहिल्याच दिवशी सोने उजळले; चांदी स्थिर
By admin | Updated: January 2, 2016 08:36 IST