सीआयआय राज्यस्तरीय स्पर्धेत बॉश संघ प्रथम
By admin | Published: January 23, 2017 8:13 PM
सातपूर : सीआयआयच्या वतीने घेण्यात आलेल्या बाराव्या राज्यस्तरीय कायझेन स्पर्धेत नाशिकच्या बॉश कंपनीच्या संघाने प्रथम क्र मांकाचे पारितोषिक पटकावले, तर द्वितीय पारितोषिक जेसीबी इंडिया लिमिटेड (पुणे), तृतीय पारितोषिक किलार्ेस्कर ऑइल इंजिन(कोल्हापूर) यांनी मिळविला, तर रोठे एर्डे इंडिया लिमिटेड (नाशिक), व इंद्रेस हौसेर फ्लावटेक (औरंगाबाद) आणि थ्रीएम इंडिया (पुणे) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
सातपूर : सीआयआयच्या वतीने घेण्यात आलेल्या बाराव्या राज्यस्तरीय कायझेन स्पर्धेत नाशिकच्या बॉश कंपनीच्या संघाने प्रथम क्र मांकाचे पारितोषिक पटकावले, तर द्वितीय पारितोषिक जेसीबी इंडिया लिमिटेड (पुणे), तृतीय पारितोषिक किलार्ेस्कर ऑइल इंजिन(कोल्हापूर) यांनी मिळविला, तर रोठे एर्डे इंडिया लिमिटेड (नाशिक), व इंद्रेस हौसेर फ्लावटेक (औरंगाबाद) आणि थ्रीएम इंडिया (पुणे) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.अंबड येथील नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या सभागृहात या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन सीआयआयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुधीर मुतालिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा समितीचे उपाध्यक्ष अजय विद्याभानू यांनी स्पर्धा आयोजनाची माहिती दिली. सीआयआय महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष सुनील खन्ना यांनी कायझन विषयीची माहिती दिली. उपाध्यक्ष ऋषीकुमार बागला यांनीही मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेत पुणे, नाशिक, मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, सांगली आदिंसह राज्यातील विविध कारखान्यांतील १००च्या वर संघ आणि ४५० कामगार कर्मचारी सहभागी झाले होते. कारखान्यात काम करताना उपाय योजना केलेल्या नावीन्यपूर्ण कल्पना सादर करण्यात आल्या.ही स्पर्धा मोठे उद्योग घटक आणि लघु व मध्यम उद्योग घटक या दोन गटांत घेण्यात आली होती. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेचे परीक्षक म्हणून पी. के. जोशी, आदेश दुसाने, मिलिंद गुणे, महेश चांडक, चारु दत्त मगदे, संजय सराफ, समीर माचवे, मॅथ्यू जॉर्ज, तुषार कुलकर्णी, सतीश तावडे, एम. जी. जोशी आदिंनी काम पाहिले. यावेळी अनिल गायनर, रोहित देशमाने, समीर जोशी, बाजीराव डावखर, संजय देसले, अनिल जाधव, नाना शिंदे आदिंसह विविध आस्थापनातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)चौकटअन्य पुरस्कार विजेते स्पर्धकएस. बी. रिशेलर्स (कोल्हापूर), युके मेटल इंडस्ट्रीज(पुणे), नितेश उद्योग (नाशिक), इंद्रेस हौसेर वेटझेर इंडिया (औरंगाबाद), राजराजेश्वरी फाउंडर्स (इचलकरंजी), अमोद इंडस्ट्रीज (अहमदनगर),महिंद्र अँड महिंद्र (नाशिक), गोदरेज अँड बाँइज लिमिटेड (सातारा) यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.फोटो, सीआयआयच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कायझेन स्पर्धेत प्रथम क्र मांकाचे पुरस्कार नाशिकच्या बॉश कंपनीच्या संघाला प्रदान करताना अध्यक्ष सुधीर मुतालिक, सुनील खन्ना, राजेंद्र गुंजाळ, सचिन माडीवाले, अनिल गायनर, रोहित देशमाने, समीर जोशी, बाजीराव डावखर, संजय देसले, अनिल जाधव, नाना शिंदे आदि.