Join us

सदर फाईल फक्त येंडे सरांसाठी आहे

By admin | Updated: September 1, 2014 20:01 IST

रक्तदान एक सामाजिक चळवळ

रक्तदान एक सामाजिक चळवळ

आजच्या विज्ञान युगात देश प्रगतीपथावर असताना अनेक सुखसुविधा उपलब्ध असून, इंटरनेटच्या युगात आपण वावरत आहोत. अनेक लहान मोठ्या बाबींना पर्याय मिळतो परंतु आजतागायत मावनी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नाही. मानवी रक्त हाच एकमेव पर्याय आहे. ज्यावेळी रुग्णाला रक्ताची आवश्यकता भासते त्यावेळी रुग्णाचे नातलग रक्तपेढीकडे धाव घेतात. रक्तपेढीकडून त्यांना रक्त मिळण्याची अपेक्षा असते. रक्तपेढीत रक्तसाठा उपलब्ध असेल तर त्याला रक्त दिल्या जाते. रक्तसाठा उपलब्ध नसेल तर त्याला रक्तदाते आणआवयास सांगितले जाते. त्यावेळी त्याला रक्ताचे महत्त्व कळते, मग तो धावपळ करतो. याआधी त्यांनी कधी मानवधर्म या नात्याने रक्ताचे दान केलेले नसते, मानवाच्या शरिरात भरपूर प्रमाणात असणारे रक्त ३५० मि.लि. रुग्णाला देऊन त्याचे प्राण आपण वाचवू शकतो.
रक्तदान का ?
मावनी रक्ताला कुठलाही पर्याय नाही
कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही.
रक्त फार काळ साठविता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाची आवश्यकता भासते.
कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना, थॅलसिमिया, सिकलसेल आजाराने ग्रस्त बालकांना आणि तीव्र ॲनिमियाच्या रुग्णांनाही रक्ताची आवश्यकता असते.
कुणाला कधीही, कुठेही रक्ताची गरज पडू शकते.
तुमच्या रक्तदानाने एखाद्या गरजवंतांचे प्राण वाचू शकतात.
रक्तदान केव्हा ?
वयाचे १८ वर्षापासून ते वयाचे ६० वर्षापर्यंत रक्तदान करता येऊ शकते
रक्तदात्याचे वजन ४५ कि.ग्रॅम किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
रक्तदात्याच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाणत १२.५ ग्रॅम असणे आवश्यक आहे.
रक्तदात्याला कोणत्याही प्रकारचा आजार नसावा तो पुर्णपणे निरोगी असावा.
असा निरोगी व्यक्ती वरील नियमांत बसत असेल तर तो दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकतो.
आजरी मानवी रक्ताची अत्यंत आवश्यकता आहे. रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा पुरेसा उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना रक्त न मिळाल्यामुळे आपले प्राण गमवावे लागतात. त्याकरिता रक्तदानाकरिता पात्र असलेल्या प्रत्येक दायित्वाचे वहन करावे.
ज्या रुग्णांनी रक्ताना सातत्याने रक्ताची गरज भासते त्यामध्ये कॅन्सर असणारा रुग्ण, थॅलसिमिया नसकलसेल आजाराने ग्रस्त असणारे बालकरुग्ण, ज्या रुग्णांना जीवनभर सातत्याने रक्तपुरवठा करावा लागतो, समाजात या रुग्णांची संख्या बरीच आहे, त्यांना मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता भासते. करिता मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीरे तसेच मोठ्या प्रमाणात स्वेच्छा रक्तदान होणे गरजेचे आहे.
स्वस्थ्य रक्तदाता हे करु शकतो
स्वस्थ्य रक्तदात्याने दर तीन महिन्याला कोणत्याही मान्यताप्राप्त रक्तपेढीत येऊन रक्तदान करावे.
एक थॅलसिमिक, सिकलसेल रुग्णास दत्तक घेऊन त्याला रक्त पुरविण्याची जबाबदारी घ्यावी.
रक्तदान शिबिराचे आयोजन करावे, रक्तदान शिबिर घेण्यास प्रोत्साहन द्यावे, शिबिरात मदत करावी.
रक्तदानासंबंधी जागृती करावी, रक्तदानासाठी तरुणांना उद्युक्त करावे.
रक्तदान चळवळीला अधिक गतीमान करण्याकरिता रक्तदानाच्या विविध उपक्रमात सक्रीय सहभाग द्यावा.
ज्या रुग्णास रक्तांची आवश्यकता आहे, त्या रुग्णांचे नातलग रक्तपेढीत रक्ताची मागणी करतात, तसेच रक्तदाता देण्यास तयार असतात, तरी सुद्धा रक्तपेढी त्या रुग्णांकडून शुल्क आकारते. ते शुल्क आकारण्याचे कारण काय? अनेकवेळा रुग्णाच्या नातलगांना असे वाटते की आम्हीच दिलेले रक्त आम्हाला देणार, मग त्यात शुल्क आकारण्याचे कारण काय?
रुग्णांकडून पैसे आकारण्याचे कारण त्यांच्या रुग्णांकरिता देण्यात येत असलेले रक्त हे विना चाचणी देता येत नाही, किंवा रक्त घेण्याकरिता जे साहित्य उदा. ब्लडबॅग, घेतलेल्या रक्ताच्या विविध प्रकारच्या चाचण्या असे हिमोग्लोबीन तपासणी, एचआयव्ही चाचणी, कावीळ ब व क ची चाचणी, चार वेळा रक्तगट तपासणी, गुप्तरोग मलेरिया, रक्ताची साठवणूक करण्याकरिता वापरण्यात येणारे विशिष्ट तापमानाचे फ्रीज व तत्सम उपकरणे, त्यासाठी लागणारा अखंडीत विद्युत पुरवठा, रुग्णाचे रक्त व रक्तपेढीतील चाचण्या पूर्ण झालेले रक्त यांची रक्त जुळवणी, या व इतर अनेक गोष्टींवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो म्हणूनच रुग्णाकडून रक्तपेढीतून रक्त घेण्याकरिता शुल्क आकारले जाते.