Join us

भावना दुखावल्या; यापुढे असे होणार नाही! उपायुक्त चिंचोलीकरांनी व्यक्त केला खेद

By admin | Updated: September 1, 2014 22:45 IST

अकोला : कोणाच्याही धार्मिक भावना दुखविण्याचा उद्देश नव्हता. कीर्ती नगरमधील सर्व्हिस लाईनचा प्रश्न निकाली काढण्यासाठी गेलो असता, मंडप उभारलेला दिसला; मात्र गैरसमजातून पुढील प्रकार घडला. यावेळी कोणताही आकस नव्हता. धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा मला प्रचंड खेद असून, यापुढे असा प्रकार पुन्हा होणार नसल्याचे उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट करीत निर्माण झालेल्या वादंगावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

मनपातील उपायुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून शहराला अतिक्रमणमुक्त करण्यासाठी धडपड सुरू केली. मुख्य रस्त्यांवरील मोक्याच्या जागा, महसूल विभागासह मनपाच्या मालकीच्या जागेवर मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमकांनी पक्की दुकाने उभारली. लिज संपल्यावरही दुकानदारी सुरूच असल्याचे कारवाईदरम्यान समोर आले. सर्वसामान्य नागरिक, शाळकरी विद्यार्थी, वयोवृद्धांना रस्त्यावरून चालणेही अवघड झाले होते. हॉटेल, रेस्टॉरन्ट व्यावसायिक शिळे अन्न रस्त्यालगत किंवा नाल्यांमध्ये टाकत असल्याने रोगराई निर्माण झाली. यामध्ये कारवाई करताना कधीही कोणाला झुकते माप दिले नसल्याचे उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी स्पष्ट केले. शहर नवीन आहे, कारवाई करताना अनपेक्षित घटना होतात. काही उणिवा राहत असतील; परंतु त्यामागचा उद्देश मात्र अतिशय स्वच्छ आहे. कीर्ती नगरमध्ये फक्त साहित्य उचलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाविकांच्या भावना दुखविण्याचा कोणताही मानस नव्हता. तरीसुद्धा भावना दुखावल्या गेल्याने त्या प्रकाराचा मनापासून खेद वाटत असल्याचे चिंचोलीकर यांनी बोलताना सांगितले.