मुंबई : फेब्रुवारी महिन्यातील महागाईची स्थिती दर्शविणारी आकडेवारी नुकतीच जाहीर झाली असून यामध्ये ठोक महागाईचा दर उणे २.०६ टक्के झाला असून, गेल्या चार महिन्यांत सातत्याने महागाईचा दर कमी होताना दिसत असून या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपात करावी, अशी आग्रही मागणी औद्योगिक संघटनांनी केली आहे. अर्थकारणात येत असलेल्या सुधाराच्या पार्श्वभूमीवर आणि नुकत्याच मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातही आर्थिक सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची घोषणा केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने व्याजदरात पाव-पाव अशी अर्धा टक्के कपात केली आहे. यापैकी एक दर कपात ही अर्थसंकल्पापूर्वी, तर एक अर्थसंकल्पानंतर अशा पद्धतीने ही दरकपात केली होती. ही दरकपात करताना अर्थव्यवस्थेतील सुधार, खाद्य, इंधन, वस्तू आधारित महागाई नियंत्रणात येत असल्याचे दिसत असून त्याच पार्श्वभूमीवर ही कपात असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. व्याजदर कपातीसाठी अनुकूल परिस्थिती आणि महागाईच्या ज्या निकषांवर रिझर्व्ह बँक बोलत आहे, ते सर्व निकष सध्या अनुकूल असून त्या दृष्टीने चालू वर्षात किमान एक टक्का व्याजदर कपात करण्यास वाव असल्याचे मत वेळोवेळी अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता येत्या सात एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेतर्फे मांडण्यात येणाऱ्या पतधोरणात व्याजदर कपात करावी, अशी आग्रही मागणी असोचेम, फिक्की अशा अग्रगण्य संघटनांनी केली आहे.गेल्या दोन वेळा व्याजदरात कपात होऊनही त्याचा लाभ बँकांनी ग्राहकांपर्यंत पोहोचविला नाही. त्यामुळे, हा लाभ ग्राहकांना मिळाला तर त्यांच्या क्रयशक्तीत वाढ होऊन त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होईल. दर कपातीमुळे होणाऱ्या फायद्यातून बँकांनी स्वत:चा अनुशेष भरण्याचा प्रयत्न करू नये. अर्थव्यवस्थेचा सारासार विचार करून त्या दृष्टीने या दरकपातीचा लाभ ग्राहकांना द्यावा, अशी आग्रही मागणीदेखील या संघटनांनी बँकांकडे केली आहे. दरम्यान, फेब्रुवारीत सरकारी कागदोपत्री ठोक महागाईचा दर उणे २.0६ टक्क्यांवर आला आहे. खाद्यवस्तू, इंधन आणि उत्पादित वस्तूंच्या किमती उतरल्यामुळे महागाईचा पारा शून्याखाली गेला आहे. ठोक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर जानेवारीत उणे 0.३९ टक्के, डिसेंबरमध्ये उणे 0.५0 टक्के आणि नोव्हेंबरमध्ये उणे 0.१७ टक्के होता. (प्रतिनिधी)४२0१४च्या फेब्रुवारीमध्ये तो ५.0३ टक्क्यांवर होता. सरकारी आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात खाद्यवस्तूंची महागाई ७.७४ टक्के, तर उत्पादित वस्तूंची महागाई 0.३३ टक्क्यांवर होती. ४इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाई उणे १४.७२ टक्क्यांवर घसरली होती, तर बिगर अन्नवस्तूंची महागाई उणे ५.५५ टक्क्यांवर घसरली आहे. ४महागाईचा दर आता विक्रमी पातळीवर घसरल्यामुळे धोरणात्मक व्याजदरांत कपात करण्याची मागणी औद्योगिक क्षेत्राकडून होत आहे.
व्याजदर कपातीस अनुकूल स्थिती
By admin | Updated: March 18, 2015 23:23 IST