Join us

बाजारातील तेजीला 9 व्या दिवशी ब्रेक!

By admin | Updated: July 25, 2014 23:34 IST

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तसेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी हे दोन्ही निर्देशांक नफा वसुलीमुळे विक्रमी पातळी गाठल्यानंतर उतरले.

मुंबई : सलग आठ दिवसांच्या तेजीनंतर शुक्रवारी शेअर बाजार कोसळला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तसेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी हे दोन्ही निर्देशांक नफा वसुलीमुळे विक्रमी पातळी गाठल्यानंतर उतरले. अनेक बडय़ा कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा जोर वाढल्याने नवव्या दिवशी तेजीला ब्रेक लागला.
3क् कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्सने गेल्या आठ व्यावसायिक सत्रंत 1,265 अंकांची वाढ मिळविली होती. आज मात्र तो 145.1क् अंकांनी उतरून क्.55 टक्क्यांच्या घसरणीसह 26,126.75 अंकांवर बंद झाला. गेल्या सलग दोन सत्रंत सेन्सेक्सने विक्रमी पातळी गाठली होती. काल सेन्सेक्स 26,271.85 अंकांवर बंद झाला होता. आजही सेन्सेक्सने चांगली कामगिरी केली होती. एका क्षणी तो 26,292.66 अंकांर्पयत वर चढला होता. नंतर विदेशी गुंतवणूकदार संस्था आणि देशांतर्गत संस्थांनी नफा वसुली केल्यामुळे बाजार घसरला. 
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही आज 7,84क्.95 अंकांच्या नव्या उंचीवर पोहोचला होता. नंतर मात्र विक्रीचा जोर वाढला. त्यामुळे तो 7,8क्क् अंकांच्या खाली आला. 4क्.15 अंकांच्या किंवा क्.51 टक्क्यांच्या घसरणीसह तो 7,79क्.45 अंकांवर बंद झाला. काल निफ्टी 7,835.65 अंकांवर बंद झाला होता. 
रिलायन्स इंडस्ट्रीज, भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस यांसारख्या बडय़ा कंपन्यांच्या काऊंटरांवरही नुकसान पाहायला मिळाले. त्यामुळे बाजारधारणोवर परिणाम झाला. विक्रीचा जोर चोहोबाजूंनी पाहायला मिळाला. 12 विभिन्न वर्गातील निर्देशांपैकी 1क् निर्देशांक तोटय़ात राहिले. केवळ आरोग्य सेवा आणि एफएमसीजी कंपन्यांच्या शेअर्समध्येच थोडी बहुत तेजी पाहायला मिळाली. शेअर बाजारात उपलब्ध झालेल्या अस्थायी आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी काल 161.55 कोटी रुपयांची शेअर खरेदी केली.
 या आठवडय़ात सेन्सेक्स 485 अंकांनी तर निफ्टी 127 अंकांनी वाढला. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या 3क् पैकी 18 कंपन्यांमध्ये घसरण पाहायला मिळाली. उरलेल्या 12 कंपन्या लाभात होत्या. टाटा मोटर्स आणि सनफार्मा या कंपन्यांना सर्वाधिक लाभ मिळाला. बाजारातील एकूण व्यवसाय वाढून 3,577.35 कोटींवर गेला. काल तो 3,1क्9.87 कोटी होता. (प्रतिनिधी)
 
4ब्रोकरांनी सांगितले की, सकाळी बाजार तेजीत होता. मात्र, नंतर नफा वसुलीचे सत्र सुरू झाले. त्याचा परिणाम बाजारधारणोवर झाला. जागतिक बाजारात कमजोरीचे संकेत प्राप्त झाल्यानंतर बाजारात विक्रीचा जोर वाढला. विशेषत: पश्चिम आशिया आणि युक्रेनमधील अशांततेचा बाजारावर परिणाम दिसून आला. आयटी कंपन्यांपैकी विप्रोचे निकाल अपेक्षित राहिले नाही. त्याचा बाजारावर आणखी परिणाम झाला. 
 
4आशियाई बाजारांत तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. चीन, हाँगकाँग, जपान, द. कोरिया येथील बाजार क्.36 ते 1.13 टक्के तेजीत होते. सिंगापूर आणि तैवान येथील बाजारांत मात्र क्.11 ते क्.93 टक्के घसरण पाहायला मिळाली.
 
4भारताची अर्थव्यवस्था सुधारत असल्याचा दावा यूबीएस या जागतिक वित्तीय सेवा क्षेत्रतील कंपनीचे म्हणणो आहे. काही औद्योगिक क्षेत्रत तेजीचे संकेत असून निफ्टी वर्षअखेरीस 8 हजारची पातळी गाठेल असेही या कंपनीचे म्हणणो आहे.
4 औद्योगिक उत्पादनाचे आकडे समाधानकारक असून वाहन विक्रीत झालेली वाढ आर्थिक आघाडीवर चित्र सकारात्मक होऊ लागल्याचे संकेत देते, असे या अहवालात म्हटले आहे.