Join us

अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त

By admin | Updated: October 29, 2014 22:08 IST

खानापूर : पातूर तालुक्यातील खानापूरचे शेतकरी सततच्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. परिसरात भारनियमनाशिवाय वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यातच पाऊस पडत नसल्याने कपाशीची रोपे सुकत चालल्यामुळे शेतकर्‍यांत चिंतेचे वातावरण आहे. पातूर येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रांतर्गत येणार्‍या खानापूर ११ केव्ही फिडरवरून १६ गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. परंतु वीज वितरणकडून भारनियमन करण्यात येत असतानाही अतिरिक्त वेळेत वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. वीज वितरणने या प्रकाराची दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. या भागातील शेतकर्‍यांचे मुख्य आर्थिक स्त्रोत शेतीच आहे. वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडण्याची दाट शक्यता आहे. ना

खानापूर : पातूर तालुक्यातील खानापूरचे शेतकरी सततच्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. परिसरात भारनियमनाशिवाय वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यातच पाऊस पडत नसल्याने कपाशीची रोपे सुकत चालल्यामुळे शेतकर्‍यांत चिंतेचे वातावरण आहे. पातूर येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रांतर्गत येणार्‍या खानापूर ११ केव्ही फिडरवरून १६ गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. परंतु वीज वितरणकडून भारनियमन करण्यात येत असतानाही अतिरिक्त वेळेत वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. वीज वितरणने या प्रकाराची दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. या भागातील शेतकर्‍यांचे मुख्य आर्थिक स्त्रोत शेतीच आहे. वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेता वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)