Join us  

चार दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजारात घसरण

By admin | Published: May 13, 2017 12:12 AM

सलग चार दिवसांच्या विक्रमी कामगिरीनंतर शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसरले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सलग चार दिवसांच्या विक्रमी कामगिरीनंतर शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसरले.३0 कंपन्यांचा सेन्सेक्स ६२.८३ अंकांनी अथवा 0.२१ टक्क्यांनी घसरून ३0,१८८.१५ अंकांवर बंद झाला. ५0 कंपन्याचा निफ्टी २१.५0 अंकांनी अथवा 0.२३ टक्क्यांनी घसरून ९,४00.९0 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील ३0 पैकी १६ कंपन्यांचे समभाग घसरले. १३ कंपन्यांचे समभाग वाढले. घसरण झालेल्या बड्या कंपन्यांत एशिएन पेंट्स, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, अदाणी पोटर््स, एचडीएफसी, पॉवर ग्रीड, आयटीसी, टाटा स्टील, एनटीपीसी आणि एमअँडएम यांचा समावेश आहे. इन्फोसिस, हीरो मोटोकॉर्प, सिप्ला, सन फार्मा, टाटा मोटर्स, टीसीएस आणि कोल इंडिया यांचे समभाग वाढले.दरम्यान, या आठवड्यात सेन्सेक्स ३२९.३५ अंकांनी अथवा १.१0 टक्क्यांनी वाढला. निफ्टीही ११५.६0 अंकांनी अथवा १.२४ टक्क्यांनी वाढला.