Join us

सोन्याची घसरण, चांदी मजबूत

By admin | Updated: May 22, 2014 02:28 IST

स्टॉकिस्टकडून विक्रीचा दबाव वाढल्यामुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव १०० रुपयांनी कोसळले.

नवी दिल्ली : स्टॉकिस्टकडून विक्रीचा दबाव वाढल्यामुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव १०० रुपयांनी कोसळले. घसरणीसह एक तोळा सोन्याचे भाव २९,३५० रुपये झाले. दुसरीकडे औद्योगिक क्षेत्रातून चांदीची मागणी वाढल्याने भाव वधारले. २०० रुपये वाढीसह एक किलो चांदीचे भाव ४१,७०० रुपये झाले. स्टॉकिस्टकडून विक्रीचा मारा वाढल्याने सोन्याच्या किमतीत घसरण आली.दिल्ली सराफा बाजारात ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचे भाव १०० रुपयांनी घसरून अनुक्रमे २९,३५० आणि २९,१५० रुपये प्रतितोळा झाले. गिन्नीचे भाव जैसे थे राहून २४,९०० रुपये प्रति आठ ग्रॅम राहिले. तयार चांदीचे भाव २०० रुपयांनी वधारून ४१,२०० रुपये प्रति किलोवर बंद झाले. चांदीच्या नाण्यांचा भाव ७९,००० ते ८०,००० रुपये प्रति शेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)