नवी दिल्ली : जागतिक बाजारातील घसरणीच्या पाश्र्वभूमीवर स्टॉकिस्टांनी विक्री केल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव 160 रुपयांनी कमी होऊन 28,200 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. औद्योगिक संस्था आणि नाणोनिर्मात्यांकडून चांगली मागणी न झाल्याने चांदीचा भावही 4क्क् रुपयांनी कोसळून 45,क्क्क् रुपये प्रतिकिलो झाला.
व्यापा:यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील घसरणीच्या कलामुळे स्टॉकिस्टांनी मौल्यवान धातूची विक्री कायम ठेवली. समभाग बाजारातील तेजीमुळेही पर्यायी गुंतवणुकीने मागणीत घट नोंदली गेली. आभूषण निर्मात्यांची मागणीही कमजोर राहिल्याने याचाही बाजार धारणोवर नकारात्मक परिणाम झाला.
सिंगापूर येथे सोन्याचा भाव क्.7 टक्क्याने कमी होऊन 1,294.98 डॉलर प्रतिऔंस झाला. गेल्या 16 जुलैनंतरची ही खालची पातळी आहे. चांदीचा भाव क्.6 टक्क्याने घटून 2क्.79 डॉलर प्रतिऔंस राहिला.
दिल्ली बाजारातच 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 16क् रुपयांच्या घसरणीसह अनुक्रमे 28,2क्क् रुपये आणि 28,क्क्क् रुपये प्रति दहा गॅ्रम झाला. यापूर्वी काल सोन्याचा भाव 16क् रुपयांनी वधारला होता. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 24,9क्क् रुपयांवर कायम राहिला. चांदीमध्येही हाच कल कायम राहिला. तयार चांदीचा भाव 4क्क् रुपयांनी कमी होऊन 45,क्क्क् रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव 46क् रुपयांनी खाली येऊन 44,635 रुपये प्रतिकिलो झाला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)