Join us

निर्यातीचा टक्का वाढतोय

By admin | Updated: April 8, 2016 22:39 IST

जागतिक अर्थकारणात दिसू लागलेल्या सुधाराच्या पार्श्वभूमीवर भारतातून होणाऱ्या निर्यातीतही वाढ होताना दिसत

मुंबई : जागतिक अर्थकारणात दिसू लागलेल्या सुधाराच्या पार्श्वभूमीवर भारतातून होणाऱ्या निर्यातीतही वाढ होताना दिसत असून यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांचा वाटा महत्त्वाचा असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. एकीकडे देशांतर्गत पातळीवर अर्थकारणात सुधार येत असताना किरकोळ प्रमाणात का होईना, पण निर्यातीतही वाढ नोंदली जात असल्याने आर्थिक ताण कमी होत असल्याचे मानले जातआहे. उद्योगांची शिखर संघटना असलेल्या ‘असोचेम’ने २००७-०८ ते २०१४-१५ या कालावधीत देशातून झालेल्या निर्यातीच्या पॅटर्नचा अभ्यास केला आहे. विशेष म्हणजे हा सर्व कालावधी जागतिक मंदीचाआहे.२००७ ते २०१५ या कालावधीत नव्हे तर गेल्या काही दशकांची आकडेवारी तपासली तरी महाराष्ट्र आणि गुजरात याच दोन राज्यांचा आलटून पालटून पहिला क्रमांक राहिलेला आहे. पण, हा कालावधी संपूर्णपणे मंदीचा असला तरी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांतून झालेल्या निर्यातीमध्ये अनुक्रमे ७.२ टक्के आणि ८ टक्के अशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. समाधानाचीबाब म्हणजे, उत्तरप्रदेश, हरियाणा या आजवर निर्यातीच्या क्षेत्रात काहीशा मागे असलेल्या राज्यातून होणाऱ्या निर्यातीतही सुधार दिसून आलाआहे. आकडेवारीत हा सुधार जरी किरकोळ असला तरी निर्यात होणे ही समाधानाचीबाब मानली जात आहे. निर्यातीच्याबाबतीत पंजाब, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांचे मागासलेपण कायम असून पायाभूत सुविधांचा अभाव हे त्यामागचे मुख्य कारण असल्याचे विश्लेषण करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)> महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांनी काळाचे महत्त्व ओळखत केलेली विशेष आर्थिक क्षेत्राची निर्मिती, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर दिलेला भर याचा मोठा फायदा निर्यात वाढण्याच्या रूपाने झाल्याचे विश्लेषण करण्यात आले आहे. > निर्यातवाढ का महत्त्वाची ?निर्यातीचे सर्व व्यवहार हे प्रामुख्याने अमेरिकी डॉलरमध्ये होतात. यामुळे देशातील मालाला परदेशी बाजारपेठ तर मिळतेच पण यामुळे परकीय चलनही मिळण्यास मदत होते व परिणामी चालू खात्यावरील वित्तीय ताण होण्याच्या रुपाने दिसून येते.