Join us

मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर-जोड बातमी ४

By admin | Updated: June 20, 2014 22:27 IST

कोट..

कोट..
जठारपेठ चौकातील अतिक्रमण हटवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश असून, नागरिक त्रस्त झाले होते. भाजी विक्रेत्यांना वारंवार सूचना दिल्यावरही नियमांचे उल्लंघन होत आहे. मनपाच्या इमारतीत त्यांना गाळे उपलब्ध करून दिले होते. त्यानंतर एका गल्लीतही जागा दिली होती. तरीही हेकेखोरपणा सुरूच आहे. अतिक्रमण हटवायची इच्छा असेल तर अकोलेकर व सामाजिक संघटनांनी समोर यावे. पर्यायी जागेचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवला जाईल.
-डॉ.महेंद्र कल्याणकर, आयुक्त मनपा

कोट..
अतिक्रमण काढताना कोणताही भेदभाव होणार नाही. कारवाई सुरूच राहील. शहराला अतिक्रमणमुक्त करण्यात येईल. दबावतंत्रापेक्षा सहकार्याची अपेक्षा आहे. अन्यथा आमच्यासमोर फौजदारीचा पर्याय आहे.
-दयानंद चिंचोलीकर, उपायुक्त मनपा