Join us  

Elon Musk News: एलन मस्क यांच्या टेस्लाची १.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक; बिटकॉइन किमतीचा उच्चांक

By देवेश फडके | Published: February 09, 2021 1:06 PM

एलन मस्क यांच्या प्रचंड  गुंतवणुकीमुळे बिटकॉइनच्या किंमतीने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. बिटकॉइनची किंमत सोमवारी ४४ हजार डॉलर्सने वाढली.

ठळक मुद्देएलन मस्क यांची बिटकॉइनमध्ये प्रचंड गुंतवणूकटेस्लाची उत्पादने बिटकॉइनच्या माध्यमातून विक्री करण्यासाठी पाऊलटेस्लाच्या गुंतवणुकीनंतर बिटकॉइनची किंमत उच्चांकी पातळीवर

वॉशिंग्टन : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क (Elon Musk) यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनमध्ये तब्बल १.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. एलन मस्क यांच्या प्रचंड  गुंतवणुकीमुळे बिटकॉइनच्या किंमतीने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. बिटकॉइनची किंमत सोमवारी ४४ हजार डॉलर्सने वाढली. (elon musks tesla invests 1 5 billion dollers in bitcoin)

भारतीय रुपयात सांगायचे झाले, तर एका बिटकॉइनची किंमत ३२ लाखांच्या जवळ पोहचली आहे. कोरोनाच्या काळात बिटकॉइनच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सन २०२१ वर्षाच्या सुरुवातीनंतर आता बिटकॉइनच्या किंमतीत ५० टक्क्यांची नोंदवण्यात आली आहे. टेस्लाच्या या गुंतवणुकीनंतर बिटकॉइन किंमतीमध्ये १४ टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. 

मुकेश अंबानींच्या Reliance Jio ची बादशाही धोक्यात; जगज्जेत्या अब्जाधीशाची कंपनी येतेय

भविष्यात टेस्लाची उत्पादने आणि वाहने खरेदी करणाऱ्यांकडून बिटकॉइनच्या स्वरुपात पैसे स्वीकारले जाऊ शकतात. यासाठी बिटकॉइनमध्ये १.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे, असे एलन मस्क यांनी सांगितले. टेस्लाकडून देण्यात आलेल्या निवेदनानंतर बिटकॉइनच्या किंमतीमध्ये १४ टक्क्यांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणारी टेस्ला सर्वांत मोठी कंपनी बनली आहे. एलन मस्क यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइल पेजवर बिटकॉइनचा हॅशटॅग अॅड केला होता. टेस्लाची ही गुंतवणूक बिटकॉइनसाठी मोठी मदतगार ठरत असल्याचे सांगितले जात आहे. एलन मस्क यांच्या एका ट्विटनंतर अनेक कंपन्यांच्या समभागात तेजी आल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, बिटकॉइन ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. डॉलर,रुपया किंवा अन्य चलनाचा वापर ज्या पद्धतीने केला जातो, तशाच पद्धतीने पण डिजिटल स्वरुपात बिटकॉइनचा वापर केला जातो. भारतात अद्याप बिटकॉइनच्या व्यवहारांना मंजूरी देण्यात आली नाही. 

 

टॅग्स :बिटकॉइनटेस्ला