Join us  

निर्यातीमुळेच अर्थव्यवस्था सक्षम, राष्ट्रपती कोविंद यांचा आशावाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:04 AM

देशाची अर्थव्यवस्था ७.४ टक्क्यांनी विकसित होत आहे, परंतु जगाला लागणाऱ्या उत्पादनांची निर्यात भारतातून व्हायला हवी.

मुंबई : देशाची अर्थव्यवस्था ७.४ टक्क्यांनी विकसित होत आहे, परंतु जगाला लागणाऱ्या उत्पादनांची निर्यात भारतातून व्हायला हवी. प्रामुख्याने सेवांची निर्यातच आपल्या अर्थव्यवस्थेला सक्षम करेल, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी जागतिक सेवा क्षेत्र परिषदेत व्यक्त केले. वाणिज्य मंत्रालय, राज्य सरकार व सीआयआयतर्फे ही परिषद व प्रदर्शन मुंबईत सुरू झाले. त्याचे उद्घाटन राष्ट्रपतींनी केले. या वेळी राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, स्टार्ट अप योजनेतून अनेक तरुणांनी व्यवसाय सुरू केला. त्यांच्यात जागतिक स्तरावर जाण्याची क्षमता आहे, पण त्यांना निर्यातक्षम व्हावे लागेल.सध्या अर्थव्यवस्थेत ६१ टक्के हिस्सा असलेल्या सेवा क्षेत्राद्वारे हे शक्य होईल. बौद्धिक संपदेसंबंधीची नवीन नियमावली नव्या उद्योजकांसाठी अनुकूल आहे. यावेळी केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वाणिज्य सचिव रिटा टीओटिया, सीआयआयचे अध्यक्ष राकेश भारती मित्तल यांच्यासह अनेक उद्योजक उपस्थित होते.>ग्लोबल एक्झिबिशन आॅन सर्व्हिसेस २०१८ या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत पार पडले.>१२ उपक्षेत्रांची निवडभविष्यात अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाने सेवा क्षेत्रातील १२ उपक्षेत्रांची निवड केली. या क्षेत्रांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.>१०० देश, ६२८ कंपन्यापरिषदेत १०० देशांच्या ६२८ कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या देशांमधील सेवा क्षेत्रांनुसार स्वतंत्र स्टॉल्सही प्रदर्शनात आहेत. भारतातील १४ राज्ये, ३७ व्यापारी संघटना, १८ मंत्रालये आदींचा या परिषद व प्रदर्शनात समावेश आहे.

टॅग्स :रामनाथ कोविंद