Join us

आर्थिक विकास दरात घट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 04:50 IST

देशाच्या आर्थिक विकास दरात (जीडीपी) २०१७-१८ मध्ये ०.४ टक्क्यांची घट झाली.

मुंबई : देशाच्या आर्थिक विकास दरात (जीडीपी) २०१७-१८ मध्ये ०.४ टक्क्यांची घट झाली. २०१७-१८ चा जीडीपी ६.७ टक्के राहिल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी घोषित केले. प्रामुख्याने कृषी, उत्पादन व खनिकर्म क्षेत्रात मोठी घट झाली.२०१६-१७ मध्ये देशाचा जीडीपी ७.१ टक्के इतका होता. त्यात नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षातघट झाली.पण २०१७-१८ च्या अखेरच्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) जीडीपी आश्चर्यकारकरीत्या ७.७ टक्क्यांवर पोहोचला. त्याआधीच्या तिन्ही तिमाहीत तो अनुक्रमे ५.६, ६.३ व ७ टक्के इतका होता.२०१७-१८ या आर्थिक वर्षात नागरिकांच्या दरडोई उत्पन्नवाढीचादर ५.७ वरून ५.४ टक्क्यांवरआला. नागरिकांच्या निव्वळ दरडोई उत्पन्नात ४४३९ रुपयांची वाढहोऊन ते ८६,६६८ रुपये झाले. त्याचवेळी दरडोई खर्चातही ५.२टक्के वाढ होऊन ते ५५,१६० रुपयांवर आले.क्षेत्र २०१६-१७ २०१७-१८कृषी ६.३ ३.४खनिकर्म १३.० २.९उत्पादन ७.९ ५.७ऊर्जा ९.२ ७.२बांधकाम १.३ ५.७संरक्षण १०.७ १०.०