Join us  

दर महिन्याला कमवा ५० हजार; काय करावे लागेल? नियम काय आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2023 11:27 AM

जर तुम्ही तुमच्या नोकरीमुळे त्रस्त असाल तर तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला पर्याय आहे.

चंद्रकांत दडस, उपसंपादक

जर तुम्ही तुमच्या नोकरीमुळे त्रस्त असाल तर तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रदूषण चाचणी केंद्र (पीयूसी) सुरू करण्याचा चांगला पर्याय आहे. यातून महिन्याला तुम्ही हजारो रुपये कमवू शकता.

काय करावे लागेल?

सर्वप्रथम स्थानिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) परवाना घ्यावा लागेल. जवळच्या कार्यालयात अर्ज करावा लागेल. सोबतच प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. स्थानिक प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल. प्रत्येक राज्यात प्रदूषण चाचणी केंद्राचे शुल्क वेगवेगळे आहे. काही राज्यांत यासाठी ऑनलाईनही अर्ज करता येतो.

नियम काय आहेत?

पीयूसी केंद्राची ओळख म्हणून पिवळ्या रंगाच्या केबिनमध्ये केंद्र उघडावे लागेल. केबिनचा आकार लांबी २.५ मीटर, रुंदी २ मीटर आणि उंची २ मीटर असावी. प्रदूषण चाचणी केंद्रावर परवाना क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. यावेळी तुम्हाला स्मोक ॲनालायझर खरेदी करावे लागेल.

कोण सुरू करू शकते?

मोटार मेकॅनिक्स, ऑटो मेकॅनिक्स, स्कूटर मेकॅनिक्स, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, डिझेल मेकॅनिक्स किंवा इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (आयटीआय) यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :व्यवसाय