Join us  

ई-कॉमर्समध्ये ‘स्टार्ट अप्स’ कंपन्याच सरस, सर्वाधिक रोजगारनिर्मिती त्यातूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 3:25 AM

ई-कॉमर्स या आधुनिक बाजार पद्धतीत ‘स्टार्ट अप्स’ कंपन्याच सरस असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

मुंबई : ई-कॉमर्स या आधुनिक बाजार पद्धतीत ‘स्टार्ट अप्स’ कंपन्याच सरस असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. ई-कॉमर्स क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देणा-या पहिल्या १० कंपन्या स्टार्ट अप्स आहेत. अ‍ॅण्ड्रॉइड व स्मार्ट फोनच्या जगतात आॅनलाइन खरेदीला महत्त्व निर्माण झाले आहे. त्यात केंद्र सरकारने मागील वर्षी नोटाबंदी जाहीर केली. त्यानंतर डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यात आले. यामुळेच सध्या ई-कॉमर्स कंपन्यांना मोठा वाव आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ‘इंडीड इंडिया’ने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. भारतीय ई-कॉमर्स उद्योग २०२६ पर्यंत २०० अब्ज डॉलरपर्यंत जाईल, असे अभ्यासात आढळून आले आहे. या क्षेत्रात स्टार्ट अप्स असणे रोजगारासाठी सकारात्मक चित्र असल्याचे इंडीड इंडियाचे एमडी शशी कुमार यांचे म्हणणे आहे.