नवी दिल्ली : जून महिन्यात कागदोपत्री महागाईचा जोर ओसरल्याचे आकडेवारी सांगत असली तरी पावसाने डोळे वटारल्याने आगामी काळात महागाई चांगलीच हैराण करण्याची शक्यता आहे, असे ठाम मत ‘डन अँड ब्रेडस्ट्रट’ या संशोधन आणि सल्लागार संस्थेने व्यक्त केले आहे.घाऊक मूल्यांक निर्देशांक आणि किरकोळ मूल्यांक निर्देशांक आधारित महागाईची आकडेवारी या महिन्यात अनुक्रमे ५.२ ते ५.४ टक्के आणि ७.४ आणि ७.६ टक्के राहण्याची शक्यता आहे.भारतीय कृषी क्षेत्रासाठी मान्सून अत्यंत महत्त्वाचा आहे. जवळपास ६० टक्के शेती पावसावर अवलंबून आहे. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेची बव्हंशी मदारही कृषी क्षेत्रावर आहे. त्यामुळे कमी पावसाचा महागाई आणि आर्थिक वृद्धीवर प्रभाव पडतो.मान्सूनची स्थिती सुधारत असल्याचे दिसत असले तरी म्हणावा तेवढा पावसाचा जोर नाही. याचा महागाईवर परिणाम होऊ शकतो. सरकारने उपाययोजना केली आहे. आगामी काळात या उपाययोजनांची भूमिका महत्त्वपूर्ण राहील, असे डन अँड ब्रेडस्ट्रटचे अर्थतज्ज्ञ अरण सिंह यांनी म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कमी पावसाने महागाई भडकणार
By admin | Updated: July 18, 2014 02:06 IST