Join us  

सहकारी बँकांचे खासगीकरण नको, आरबीआयने दृष्टिकोन बदलावा - गडकरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:34 AM

सहकारी बँकांचा विकास व्हावा, यासाठी रिझर्व्ह बँकेने स्वतंत्र धोरण आखावे. विलीनीकरणाद्वारे त्यांचे खासगीकरण करू नये. सहकारी बँकांची तुलना खासगी बँकांशी करावी, परंतु सहकार म्हणजे, सामाजिक व आर्थिक चळवळ आहे, याचे भान रिझर्व्ह बँकेने ठेवावे आणि सहकाराविषयीचा दृष्टिकोन बदलावा, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

मुंबई : सहकारी बँकांचा विकास व्हावा, यासाठी रिझर्व्ह बँकेने स्वतंत्र धोरण आखावे. विलीनीकरणाद्वारे त्यांचे खासगीकरण करू नये. सहकारी बँकांची तुलना खासगी बँकांशी करावी, परंतु सहकार म्हणजे, सामाजिक व आर्थिक चळवळ आहे, याचे भान रिझर्व्ह बँकेने ठेवावे आणि सहकाराविषयीचा दृष्टिकोन बदलावा, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या सारस्वत बँकेचा शतकमहोत्सवी शुभारंभ सोहळा गुरुवारी षण्मुखानंद सभागृहात पार पडला. त्या वेळी ते म्हणाले की, काही सहकारी बँकांत घोटाळा झाला, म्हणून सर्व बँकांकडे वाईट दृष्टीने पाहू नये.महाराष्ट्र गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमध्ये सहकारी चळवळ यशस्वी झाली. सहकार क्षेत्राच्या ताकदीचा अंदाज दिल्लीत व रिझर्व्ह बँकेला आलेला नाही.या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू, रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक सुदर्शन सेन, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, उपाध्यक्ष शशिकांत साखळकर, व्यवस्थापकीय संचालक स्मिता संधाने उपस्थित होते. या वेळी सारस्वत बँकेच्या क्रेडिट कार्ड, गिफ्ट कार्ड आणि प्रीपेड कार्डचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. शंभराव्या वर्षात पदार्पण हा बँकेच्या प्रगतीचा मोठा टप्पा आहे. ही बँक आता राष्ट्रीय झाली आहे. बँक एक लाख कोटींचा टप्पा सहज गाठेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, कोअर बँकिंग आणणारी, संगणकीकरण करणारी, मोठ्या बँकांशी स्पर्धा करणारी बँक म्हणून सारस्वत बँकेची ओळख आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे म्हणाले की, सारस्वत बँकेचे माजी अध्यक्ष एकनाथ ठाकूर आणि आनंदवन यांचे जुने ऋणानुबंध आहेत.बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत बँकेने ३८,००० कोटी वरून ५५,००० कोटींचा व्यवसाय केलेला आहे. म्हणजेच ४४% ने व्यवसाय वाढला आहे. इतर सहकारी बँकांना फायदा व्हावा, यासाठी आम्ही बँकिंग प्रशिक्षण केंद्र उभारणार आहोत.समारंभाला खा. आनंदराव अडसूळ, राज्यमंत्री दीपक केसरकर, माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, महाराष्ट्र व्यापारी पेठेचे अनंत भालेकर, साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, माजी खा. भारतकुमार राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकनितीन गडकरीदेवेंद्र फडणवीससुरेश प्रभू