Join us  

परतफेडीच्या गप्पा नकोत, द्यायची तर ठोस आॅफर द्या; पीएनबीने नीरव मोदीला सुनावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 5:49 AM

आमच्या एका शाखेतून तुम्हाला बेकायदेशीरपणे दिल्या गेलेल्या ‘लेटर आॅफ अंडरटेकिंग्ज’मुळे (एलओयू) झालेले नुकसान तुम्ही कसे भरून देणार, याचा काही ठोस व अमलात आणता येईल, असा प्रस्ताव द्यायचा असेल तर द्या

नवी दिल्ली : आमच्या एका शाखेतून तुम्हाला बेकायदेशीरपणे दिल्या गेलेल्या ‘लेटर आॅफ अंडरटेकिंग्ज’मुळे (एलओयू) झालेले नुकसान तुम्ही कसे भरून देणार, याचा काही ठोस व अमलात आणता येईल, असा प्रस्ताव द्यायचा असेल तर द्या, असे उत्तर पंजाब नॅशनल बँकेने संशयित आरोपी नीरव मोदी याला पाठविले असल्याचे कळते.मी सर्व पैसे चुकते करण्याची आॅफर दिलेली असूनही तुम्ही गुन्हा नोंदवून झटपट वसुलीचा आततायीपणा केलात. त्यामुळे माझा धंदा बंद झाला आणि पैसे परत करण्याचा माझा व ते वसूल करण्याचा तुमचा मार्ग बंद झाला, असे ई-मेल नीरव मोदीने गेल्या आठवड्यात बँकेस पाठविला होता. सूत्रांनुसार बँकेच्या महाव्यवस्थापक (आंतरराष्ट्रीय बँकिंग विभाग) अश्विनी वत्स यांनी याला ई-मेलने उत्तर पाठवून मोदीने मांडलेले म्हणणे बँकेस अमान्य असल्याचे कळविले आहे.सूत्रांनुसार वत्स यांनी मोदी यास कळविले आहे की, बँकेतील काही अधिकाºयांकडून तुम्हाला बेकायदेशीरपणे ‘एलओयू’ दिल्या जात होत्या. त्या देण्याचा त्यांना कोणताही अधिकार नव्हता. त्यामुळे बँकेने तुम्हाला आणि तुमच्या तीन फर्मना कधीही अधिकृतपणे ‘एलओयू’ दिलेल्या नाहीत.बँकेने आततायीपणा करून वसुलीचा मार्ग बंद केला, याचा इन्कार करताना पीएनबी म्हणते की, या बेकायदेशीर ‘एलओयूं’मुळे परकीय चलन नियंत्रण कायदा (फेमा) व मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यावर त्याची माहिती तपास यंत्रणांना देणे बँकेचे कर्तव्य होते.वत्स यांनी नीरव मोदीला असेही कळविल्याचे समजते की, सर्व कायदेशीर देणी चुकती करण्याची भाषा तुम्ही केली आहे. परंतु त्यासाठी सुरुवातीला काही रक्कम देऊ केलेली नाही किंवा परतफेडीचे निश्चित वेळापत्रकही कळविलेले नाही. तरी तुम्हाला काही ठोस व अमलात आणता येईल अशी आॅफर द्यायची असल्याचे उलट उत्तरी कळवावे.ग्लोबल पेमेंट नियंत्रण वाढविले : मुंबई : पीएनबीने फसवणूक प्रकरणानंतर ग्लोबल पेमेंट नेटवर्कवरील (एसडब्ल्यूआयएफटी) नियंत्रण वाढविले आहे. नव्या उपाययोजनांनुसार आता केवळ पीएनबीचे अधिकारी ‘स्वीफ्ट’नुसार मेसेज करू शकतील. या प्रक्रियेतून आता क्लर्कला हटविण्यात आले आहे. सर्व विभागीय कार्यालयांना पाठविण्यात आलेल्या संदेशात म्हटले आहे की, स्वीफ्ट मेसेज तीन वेगवेगळ्या अधिकाºयांकडून सत्यापित होतील. यापूर्वी दोन व्यक्ती ही प्रक्रिया करत होते.फटका सोसण्याची बँकेची कुवत आहे...पीएनबीने या ११,४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची माहिती शेअर बाजारांना दिलेल्या पत्रात उघड केली होती. आता बँकेने शेअर बाजारांकडे एक नवी खुलासेवजा नोट पाठवून गेल्या दोन आठवड्यांत यावरून गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झालेली धास्ती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.या घोटाळ्याने बसणारा संभाव्य फटका सोसण्यास पुरेसे भांडवल व मालमत्ता आहेत, असा दावा करून बँकेने सरकारकडून भांडवलासाठी ५,४७३ कोटी रुपये मिळणार असल्याचेही नमूद केले आहे. शिवाय बँकेच्या देशभर बºयाच स्थावर मालमत्ता असून त्यातूनही पैसा उभा राहू शकतो, असे म्हटले आहे.

टॅग्स :नीरव मोदीपंजाब नॅशनल बँक घोटाळा