Join us  

Diwali 2020 : मुहुर्त ट्रेडिंगच्या खरेदीमुळे शेअर बाजारात रेकॉर्डब्रेक उसळी, गुंतवणुकदारांकडून जोरदार खरेदी

By बाळकृष्ण परब | Published: November 14, 2020 8:47 PM

Muhurat Trading News : सामान्यपणे भारतीय शेअर बाजार हे शनिवारी बंद असतात. मात्र मुहुर्त ट्रेंडिंगसाठी आणि लक्ष्मी पूजनासाठी काही काळ शेअर बाजार उघडला जातो.

मुंबई - आज लक्ष्मीपूजनामुळे झालेल्या मुहुर्त ट्रेंडिंगच्या खरेदीमुळे शेअर बाजारात उसळी दिसून आली. सामान्यपणे भारतीय शेअर बाजार हे शनिवारी बंद असतात. मात्र मुहुर्त ट्रेंडिंगसाठी आणि लक्ष्मी पूजनासाठी काही काळ शेअर बाजार उघडला जातो. आज संवत वर्ष २०७७ च्या सुरुवातीला शनिवारी विशेष मुहर्तावर शेअर बाजारात कारभाराला सुरुवात झाली. दरम्यान, आजच्या मुहूर्त ट्रेंडिंगमध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स ३८१ अंकांनी उसळून आपल्या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला.मुंबई शेअर बाजारामध्ये आज संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी मुहुर्ताच्या खरेदीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच शेअर बाजाराचा निर्देशांक ३८०.७६ अंकांनी वधावरून ४३ हजार ८२३.७६ च्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला. तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टीसुद्धा ११७.८५ अंकांसह १२ हजार ८०८.६५ या आपल्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला.

बीएसईमध्ये आजच्या खरेदीत टेलिकॉम, औद्योगिक आणि वित्तक्षेत्रासह जवळ जवळ सर्व क्षेत्रातील निर्देशांक फायद्याच्या चिन्हांमध्ये होते. तत्पूर्वी व्यावसायिक आणि गुंतवणुकदारांनी संवत २०७७ च्या पहिल्या व्यावसायिक सत्राच्या दिवशी आपल्या नव्या वहीखात्यांची सुरुवात केली. आज सेंसेक्समध्ये मुख्य लाभ घेणाऱ्या कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, टाटा स्टील, भारती एअरटेल, एल अँड टी, अ‍ॅक्सिस बँक आणि आयटीसीचा समावेश होता. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये १.९३ टक्क्यांची वाढ दिसून आली.मात्र एनटीपीसी, पॉवरग्रिड आणि नेस्ले इंडिया या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ०.७७ टक्क्यांची घसरण दिसून आली. बाजाराच्या आकडेवारीनुसार विदेशी संस्थागत गुंतवणुकदारांनी शुक्रवारी १ हजार ९३५.९२ कोटींच्या शेअर्सची खरेदी केली होती. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणुकदारांनी अस्थानि व्यापाराच्या आकडेवारीनुसार २ हजार ४६२.४२ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री झाली.मुहुर्त ट्रेंडिंग म्हणजे कायदिवाळी दिवशी व्यावसायिकक माता लक्ष्मीची आराधना करतात. तसेच या दिवशी व्यवसाय बंद न करता आपले काम अधिक निष्ठेने करतात. नव्या वर्षातील नव्या व्यवहाराची सुरुवात करतात. दिवाळीच्या दिवशी कुठल्याही व्यवसायाची सुरुवात केल्यास वर्षभराच्या व्यवसायाची भरभराट होते. या दिवशी ब्रोकर मुहुर्त ट्रेंडिंग पूर्वी वहिखात्यांची पूजा करतात. याला चोपडा पूजन म्हणतात.

 

टॅग्स :दिवाळीव्यवसायशेअर बाजारनिर्देशांक